shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते डॉ. अरुण जाधव यांचा सत्कार.

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते डॉ. अरुण जाधव यांचा सत्कार.
इंदापूर प्रतिनिधीी: राजमान्यता असलेल्या व जनाश्रय लाभलेल्या होमिओपॅथी या आधुनिक चिकित्सा पध्दतीचा विकास, प्रचार व हजारो रुग्णांची भारती विद्यापीठ होमिओपॅथिक विभागाच्या माध्यमातून रोगमुक्ती केल्याबद्दल पुणे भारती विद्यापीठ होमिओपॅथिक महाविद्यालयाचे प्रा. डॉ. अरुण जाधव यांना राज्यस्तरीय आरोग्य सन्मान पुरस्काराने गौरविण्यात आले.
मुंबई राजभवन येथे झालेल्या कार्यक्रमात होमिओपॅथीचे जनक डॉ. सॅम्युअल हनेमन यांच्या नावे असलेला हेल्थकेअर एक्सलन्स अवॉर्ड २०२१ चे वितरण राज्यपाल भगतसिंह
कोश्यारी यांच्या हस्ते डॉ.अरुण जाधव यांना करण्यात आले. डॉक्टर्स डिरेक्टर्स इंडिया व क्लाऊड फाउंडेशन या संस्थेच्यासंयुक्तविद्यमाने  कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. 
  यावेळी फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. गिरीश कामत, उपाध्यक्ष डॉ. देवेंद्र हंबर्डीकर, मुख्य संयोजक डॉ. मनोज देशपांडे, डॉ. आशुतोष गुप्ता, डॉ. संजय कदम यांनी कार्यक्रमाचा उद्देश सांगितला. पुणे शहर व जिल्ह्यातील इंदापूर, बारामती, पुरंदर तालुक्यातील हजारो रुग्णांवर त्यांनी मोफत आरोग्य शिबिरातून होमिओपॅथिक औषधोपचार केले आहेत. शिबिर, व्याख्याने व कार्य शाळेच्या माध्यमातून होमिओपॅथीस जनाश्रय मिळवून देण्यात त्यांनी महत्वपूर्ण योगदान दिले.
सत्कारमूर्ती डॉ. अरुण जाधव म्हणाले, होमिओपॅथीक वैद्यकीय क्षेत्रातील शैक्षणिक, सामाजिक, संशोधनात्मक, ग्रामीण भागात होमिओपॅथीचा प्रसार व प्रचार, कोरोनाकाळात रोगमुक्तीसाठी दिलेले लक्षवेधी योगदान लक्षात घेऊन मला हा पुरस्कार मिळाला आहे. हा पुरस्कार होमिओपॅथीचा प्रचार करणाऱ्या सर्वांना अर्पण आहे.
या पुरस्काराबद्दल महाराष्ट्र होमिओपॅथिक परिषदेचे माजी अध्यक्ष डॉ. बाहुबली शहा, केंद्रीय होमिओपॅथिक परिषदेचे माजीसंचालक डॉ. रवी भोसले, डॉ. अमरसिंह निकम,  महाराष्ट्र होमिओपॅथिक परिषदेचे संचालक डॉ. बाळकृष्ण गायकवाड, इंदापूर होमिओपॅथिक डॉक्टर्स असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष डॉ. संदेश शहा, बारामती होमिओपॅथिक डॉक्टर्स असोसिएशनचे संस्थापक डॉ.नंदकुमार झांबरे यांनी अभिनंदन केले.  
फोटो : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते हेल्थकेअर एक्सलन्स अवॉर्ड २०२१ स्वीकारताना पुणे भारती विद्यापीठ होमिओपॅथिक महाविद्यालयाचे प्रा. डॉ. अरुण जाधव.
close