shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

पर्यावरण जनजागरण (७६)..पारिजात / प्राजक्त Nyctantches Arbor-tristis


पर्यावरण जनजागरणाच्यादृष्टीने नक्षत्रवनाचा विचार केल्यास तूळ राशीच्या विशाखा नक्षत्राचा आराध्यवृक्ष पारिजात/ प्राजक्त हा आहे.

साधारणतः सात फुटापासू तीस पस्तीस फूट उंचीपर्यंत वाढणारा हा वृक्ष भारतात सर्वत्र आढळतो. समुद्रमंथनातून जी रत्ने प्रकटली त्यातील एक रत्न म्हणून पारिजातकाला विशेष मान आहे.

पारिजातकाची पाने ही स्पर्शाला गाईच्या जिभेसारखी खरखरीत, वरच्या बाजूला हिरवी आणि खालील बाजूला पांढूरकी असतात. पारिजातकाची फुले खूप सुवासिक, नाजूक आणि देठाला नारंगी आणि पाच सफेद पाकळ्या अशी असतात. पावसाळ्यात या फुलांचा सडा पडतो म्हणजे झाडावर चढून ही फुले काढावी लागत नाहीत.

पारिजातकाची फळे चपटी आणि द्विकोणीय असतात. यात दोन बीजे असतात. बिया नोव्हेंबर ते फेब्रुवारी या
काळामध्ये तयार होतात. पूर्वी पारिजातकाच्या पानांचा वापर लाकूड पॉलिश करण्यासाठी करीत असत. पोटातील कृमी आणि यकृतविकार यावर पारिजातकाच्या पानांचा रस हे औषध आहे. श्वसनमार्ग आणि रक्तशुद्धी यासाठी पारिजातकाच्या सालीचे चूर्ण घ्यावे. थंडी ताप असेल तर पारिजातकाच्या पानांचा रस/ काढा द्यावा. पारिजातकाच्या फुलांचे केशरी डेख काढुन त्याचा खावयचा रंग बनवतात. कपडेही रंगवतात. पारिजातकाच्या बिया पाण्यात भिजवून त्या वाटून त्याचा लेप तयार करावा व डोक्यामध्ये जेथे चाई पडलेली आहे तेथे लावावा जेणेकरून डोक्यावरती केस पुन्हा येतात.

 सर्पदंशावर पारिजातकाच्या पानांचा आणि सालीचा रस लावावा. गजकर्ण अथवा त्वचा विकार आहे अशांनी पारिजातकाच्या पानांचा रस लावावा. थंडी तापात पारिजातकाच्या पानांचा काढा उपयुक्त आहे.
वृक्ष आणि जीवसृष्टी यांचं घनिष्ट नातं  आहे यातून सुधारणावादी मानवाने बोध घेऊन वृक्ष लागवड, वृक्ष संवर्धन आणि त्यातून पर्यावरणाचे रक्षण करणे ही राष्ट्रभक्ती आहे हे समजून आचरण करणे ही काळाची गरज आहे. 

लेखक : चंद्रकांत शहासने, पुणे
संतवांड़मयाचे विज्ञाननिष्ठनिरुपणकार
मोबाईल क्रमांक : ९८८१३७३५८५

कर्नाळा चॅरिटेबल ट्रस्ट पुणे यांच्यावतीने पर्यावरण जनजागृती  उपक्रमांतर्गत..
पर्यावरण दिन ५ जून २०२१पासून वन हुतात्मादिन ११ सप्टेंबर २०२१पर्यंत असे ९९ दिवसांचे पर्यावरण जनजागृती अभियान..!
close