संतोष राऊळ यांची येवला शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या साहित्य, कला व सांस्कृतिक विभागाच्या अध्यक्षपदी नियुक्ती..
येवला-(विशेष प्रतिनिधी):
येवला येथील उपक्रमशील कलाशिक्षक श्री. संतोष राऊळ सर यांना राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री आणि येवल्याचे आमदार मा. छगन भुजबळ साहेब यांच्या हस्ते येवला राष्ट्रवादी काँग्रेस साहित्य, कला व सांस्कृतिक विभाग अध्यक्ष पदासाठी नियुक्ती पत्र देण्यात आले.पालकमंत्री छगन भुजबळ हे विकासकामांच्या दौऱ्यासाठी येवला येथे आले असता राष्ट्रवादी संपर्क कार्यलयावर हे नियुक्ती पत्र दिले व सरांना कार्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या.
नाशिक जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष रवींद्रनाना पगार यांनी पत्रकाद्वारे संतोष राऊळ यांची नियुक्ती केली. सदर कार्यक्रमास पालकमंत्री भुजबळ यांच्या बरोबरच त्याचे स्विय सहाय्यक बाळासाहेब लोखंडे, मतदार संघ अध्यक्ष वसंत पवार, येवला शहराध्यक्ष दीपक लोणारी, गोटू मांजरे, सुभाष गांगुर्डे, सुमित थोरात व राऊळ समाज बांधव व युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

