shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

पर्यावरण जनजागरण(८०)..!सरल वृक्ष (Pinus roxburghil )



पर्यावरण जनजागरणाच्या दृष्टीने नक्षत्रवनाचा विचार केल्यास वृश्चिक राशीच्या ज्येष्ठानक्षत्राचा आराध्यवृक्ष सरल ( Pinus roxburghil ) हा आहे.

 सरल म्हणजेच पाईन होय. हिमालयात दोनहजार ते साडेसहाहजार फूट उंचीवर हे वृक्ष वाढतात. देवदार ट्रापिकल पाईन हिमालयीन पाईन या सरलवृक्षाच्या जाती आहेत. महाराष्ट्रात हे वृक्ष नसतात. तथापि पाचगणी येथे गुरेघर वनसंशोधन केंद्रात याची यशस्वी लागवड केलेली आहे. 

सरलवृक्षाची साल वजनाला हलकी आणि काळपट चॉकलेटी रंगाची असते. सरासरी ९०० ते ३००० मिलिमीटर पर्जन्याच्या क्षेत्रात उतारावर, निचरा होणाऱ्या जमिनीवर ही झाडे वाढतात. या झाडाची नरफुले जानेवारी-फेब्रुवारीत येऊन मार्च एप्रिलमध्ये पिकतात. तर मादी फुले फेब्रुवारी-मार्चमध्ये येऊन परागीकरण झाल्यावर बंद होतात.. 

या वृक्षाला तीन वर्षांनी एकदाच बीज येते. ते अत्यंत हलके आणि वार्‍याने उडून जाणारे असते. सरलवृक्षापासून मोठ्या प्रमाणात रेझीन तयार होते. तसेच टरपेन्टाइल, औषधे, सुगंधी अत्तरे, रासायनिक रंग, किटकनाशके यापासून तयार होतात. सरलचे तेल यकृतासाठी उपयुक्त तसेच पोटातील जंत,अमांश यासाठी उपयुक्त असून घामाची दुर्गंधी नाहिशी करते.

वृक्ष आणि जीवसृष्टी यांचं घनिष्ट नातं  आहे यातून सुधारणावादी मानवाने बोध घेऊन वृक्ष लागवड, वृक्ष संवर्धन आणि त्यातून पर्यावरणाचे रक्षण करणे ही राष्ट्रभक्ती आहे हे समजून आचरण करणे ही काळाची गरज आहे. 

लेखक : चंद्रकांत शहासने, पुणे
संतवांड़मयाचे विज्ञाननिष्ठनिरुपणकार
मोबाईल क्रमांक : ९८८१३७३५८५

*कर्नाळा चॅरिटेबल ट्रस्ट पुणे यांच्यावतीने पर्यावरण जनजागृती  उपक्रमांतर्गत..!
*पर्यावरण दिन ५ जून २०२१पासून वन हुतात्मादिन ११ सप्टेंबर २०२१पर्यंत असे ९९ दिवसांचे पर्यावरण जनजागृती अभियान..!
close