shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

पर्यावरण जनजागरण (८१)राळवृक्ष. (साल) यक्षधुपShorea robusta.



पर्यावरण जनजागरणाच्यादृष्टीने नक्षत्रवनाचा विचार करता धनु राशीत मूळ नक्षत्राचा आराध्यवृक्ष राळवृक्ष (साल) यक्षधूप हा आहे. 

या झाडाच्या सालीपासून तसेच बाहेरील लाकडापासून डिंकासारखा जो पदार्थ निघतो त्याला रेझीन असे म्हणतात. पाण्यामध्ये ते विरघळत नाही. त्यासाठी अल्कोहोल अथवा इथर लागते. रेझीनलाच राळ असे म्हणतात . हा पदार्थ सुगंधी धूपासारखा जळतो. म्हणून याला धूपवृक्ष असेही म्हणतात. 

राळवृक्ष उत्तर भारतामध्ये आढळतो. समुद्रसपाटीपासून ९१४ मीटर उंचीपर्यंत सरासरी एक हजार ते चारहजार पाचशे मिलिमीटर पर्जन्यमानाच्या ४७ डिग्री सेंटीग्रेड तापमानापर्यंतच्या प्रदेशात, उत्तम निचऱ्याच्या कसदार जमिनीमध्ये हा सदाहरित वृक्ष आढळतो. मात्र काळ्या कसदार जमिनीमध्ये हा वृक्ष वाढत नाही. राळ/सालवृक्षाचे मानवनिर्मित सर्वात जुने रोपवन अठराशे सत्तावन मध्ये बरेली क्लब कंपाऊंडमध्ये तयार करण्यात आलेले आहे.

राळ वृक्षाची साल चॉकलेटी खडबडीत आणि अडीच सेंटीमीटर पर्यंत जाडीची असते. पाने १० ते २५.४  सेंटीमीटर लांबीची दहाबारा रेषांची असतात. या वृक्षाला मार्चमध्ये राखाडी रंगाची व आतून नारंगी रंगाची फूले येतात. तीन पंख असलेले फळ असते. हे पंख बीच्या सहापट मोठे  ५.०० ते ७.६ सेंटीमीटर लांबीचे असतात. या वृक्षाचा बीजप्रचार वाऱ्याने होतो. राळ हे पचनशक्ती वाढविणारे औषध जंतूनाशक आहे. 

गनोरिया रोगामध्ये या वृक्षाचा डिंक वापरतात. मध आणि साखर याबरोबर डिंक घेतल्यास लैंगिक शक्ती वाढते. वृक्षाच्या लाकडापासून तेल तयार होते. राळवृक्षाच्या लाकडामध्ये खिळा ठोकला तर तो अधिक घट्टपणे धरून राहतो यासाठी रेल्वेच्या स्लीपरकरिता या वृक्षाचे लाकूड वापरतात. तसेच बोटी आणि जहाजे बांधण्यासाठी या लाकडाचा सर्रास वापर होतो. 


वृक्ष आणि जीवसृष्टी यांचं घनिष्ट नातं आहे यातून सुधारणावादी मानवाने बोध घेऊन वृक्ष लागवड, वृक्ष संवर्धन आणि त्यातून पर्यावरणाचे रक्षण करणे ही राष्ट्रभक्ती आहे हे समजून आचरण करणे ही काळाची गरज आहे. 

लेखक : चंद्रकांत शहासने, पुणे
संतवांड़मयाचे विज्ञाननिष्ठनिरुपणकार
मोबाईल क्रमांक : ९८८१३७३५८५

*कर्नाळा चॅरिटेबल ट्रस्ट पुणे यांच्यावतीने पर्यावरण जनजागृती  उपक्रमांतर्गत..!
*पर्यावरण दिन ५ जून २०२१पासून वन हुतात्मादिन ११ सप्टेंबर २०२१पर्यंत असे ९९ दिवसांचे पर्यावरण जनजागृती अभियान
________
close