प्रकाश मुंडे | बीड जिल्हा प्रतिनिधी :-
खरीप 2020 चा पिक विमा योजनेचे पैसे देण्यासंदर्भात कंपन्याकडून शेतकऱ्यांना वेठीस धरले जाते आहे . खरीप 2020 चा शेतकऱ्यांनी पिक विमा पिकांचा नियमानुसार उतरला , खूप मोठ्या प्रमाणावर अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे पिकांचे नुकसान झाल्यामुळे महसूल व कृषी विभागामार्फत पंचनामे करून शासनाकडे अहवाल सादर करण्यात आले. परंतु पिक विमा कंपनीला केंद्र व राज्य सरकारने संपूर्ण पैसे वर्ग करण्याच्या ऐवजी अर्धेच पैसे वर्ग केल्या मुळे कंपन्यांचा शासनावर राहिलेले पैसे देतात का नाही यासंदर्भात विश्वास राहिला नाही, त्यामुळे गेली खरीप 2020 चा पिक विमा कंपन्यानी वाटप केला नाही.
अनेक राजकीय पक्षा मार्फत व शेतकर्यांच्या वतीने आंदोलन करण्यात आली. काही शेतकऱ्यांनी उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल केल्या त्यामुळे शासन अडचणीत आले. पिक विमा संर्दभात सर्व अडचणी वर मार्ग काढण्यासाठी शासनाने कडुन कृषी मंत्री, प्रधान सचिव ,कृषी आयुक्त, कंपनीचे प्रतिनिधी यांची संयुक्त बैठक होऊन सर्व बाजूने चर्चा करून प्रत्येक शेतकऱ्यांच्या खात्यावर आणेवारी नुसार पैसे पीक विम्याची त्वरित देण्याचे आदेश शासनाकडून पिक विमा कंपन्यांना देण्यात आले. त्यावर तात्काळ कंपनी स्तरावर सर्व बाजू तपासून शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावर पैसे वर्ग करण्याची प्रक्रियाला गती आल्याची माहिती आहे. पिक विमा कंपनीकडून शेतकऱ्याला विम्याचे पैसे देण्यास दिरंगाई झाल्यामुळे 12 टक्के व्याजाने पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग करण्यासंदर्भात नियमानुसार मागणी शेतकऱ्यांनी महाराष्ट्र शासनाकडे निवेदनाद्वारे केली आहे.


