shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

कर्मयोगी शंकरराव पाटील सहकारी साखर कारखाना पंचवार्षिक निवडणुकीसाठी हर्षवर्धन पाटील यांनी दाखल केला दोन जागेवरती उमेदवारी अर्ज.

कर्मयोगी शंकरराव पाटील सहकारी साखर कारखाना पंचवार्षिक निवडणुकीसाठी हर्षवर्धन पाटील यांनी दाखल केला दोन जागेवरती उमेदवारी अर्ज.
इंदापूर प्रतिनिधी:कर्मयोगी शंकरराव पाटील सहकारी साखर कारखाना पंचवार्षिक निवडणुकीसाठी माजी सहकार व संसदीय कार्यमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी आज (दि.२३ सप्टेंबर) रोजी दोन जागांसाठी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.

माजी सहकार व संसदीय कार्यमंत्री मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या नेतृत्वाखालील कर्मयोगी शंकरराव पाटील सहकारी साखर कारखान्याची निवडणूक प्रक्रिया होत असून अर्ज दाखल करण्याचा आजचा दुसरा दिवस आहे. एकूण २१ जागांसाठी ही निवडणूक प्रक्रिया पार पडत आहे.


 
माजी मंत्री पाटील यांनी ऊस उत्पादक कालठण गटातून एक अर्ज दाखल केला असून दुसरा अर्ज ब वर्ग प्रतिनिधी म्हणून सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार श्रीकांत पाटील , निवासी नायब तहसीलदार ठोंबरे ,सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा निबंधक सहकारी संस्था इंदापूर जिजाबा गावडे यांच्याकडे हर्षवर्धन पाटील यांनी अर्ज दाखल केला.

यावेळी पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक आप्पासाहेब जगदाळे , निरा भिमा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन लालासाहेब पवार, व्हाईस चेअरमन कांतीलाल झगडे ,संचालक उदयसिंह पाटील,राजवर्धन पाटील व इतर मान्यवर  उपस्थित होते.
close