shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

आयुष इंटरनॅशनल मेडिकल असोसिएशन तर्फे बदलापुर येथील निसर्गोपचार तज्ञ डॉ प्रविण निचत ह्यांना AIMA रत्न पुरस्काराणे सन्मानित..!!

प्रतिनिधी औरंगाबाद 
दिनांक 27 सप्टेंबर 2021 रोजी यशवंतराव चव्हाण नाट्यगृह औरंगाबाद येथे बदलापुर येथील निसर्गोपचार तज्ञ डॉ प्रविण निचत, शतायुषी निसर्ग उपचार केंद्र मुंबई व होप फाऊंडेशन मुंबई तर्फे कोरोना साथीच्या काळात  उल्लेखनीय व अपवादात्मक कामगिरी केल्या कार्याबद्दल आयुष इंटरनॅशनल मेडिकल असोसिएशनने त्यांची दखल घेत त्यांना AIMA रत्न पुरस्काराने सन्मानित केले आहे. 


आयुष इंटरनॅशनल मेडिकल असोसिएशन ही एक जागतिक स्तरावरील 7 पॅथीचे संघटन असून आयुर्वेद, ॲक्युपंचर, योगा, नॅचरोपॅथी, युनानी, सिद्धा आणि होमिओपॅथी, या सर्वांचा समावेश आहे. ही संस्था वरील सात पॅथी आरोग्य क्षेत्रात काम करणारी संस्था आहे. 

कोरोना साथीच्या काळात  आपल्या विभागातील, देशासाठी, समाजासाठी जीवाची परवा न करता नागरिकांच्या सुरक्षेसाठी अहोरात्र केलेल्या कार्याबद्दल डॉक्टर प्रवीण निचत ह्यांना आयुष इंटरनॅशनल मेडिकल असोसिएशन तर्फे अध्यक्ष डॉक्टर सतीश कराळे व डॉक्टर बाबुराव कानडे यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आला.


ते वैद्यकीय क्षेत्रात निसर्गोपचार चा प्रचार व प्रसार करण्यासाठी सर्वाना मोफत टेलिफोनद्वारे सर्वच रोगांवर "घरगुती उपाय" सांगतात. त्याचे ते एकही रुपया आकारत नाही. अशी ही त्यांची आगळी वेगळी समाज भक्ति व निस्वार्थ भावनेने केलेले समाजकार्य गेले कित्येक वर्षांपासून करत आहेत.  त्यांच्या या कार्याची वेगवेगळ्या संस्थांनी दखल घेऊन जवळपास 130 राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित केले आहे.
close