shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

पर्यावरण जनजागरण(१०६) , औषधी वृक्ष : कांचन

पर्यावरण जनजागरण (१०६)
औषधी वृक्ष : कांचन
सर्वत्र आढळणारा परंतु औषधी गुणधर्म माहीत नसल्यामुळे दुर्लक्षित असलेला असा कांचन वृक्ष याला हिंदीमध्ये गुरियल, कच्चर, संस्कृत मध्ये कांचनार, कोविदरा तर इंग्रजीमध्ये Orchid Tree Camel's foot tree असे म्हणतात

कांचन वृक्षाचे मूळ, साल, फुले व कळ्या या औषधी आहेत.कांचनाच्या सालीचे चुर्ण काढा करून वापरावे. हे पौष्टिक, भूक वाढवणारे, बलदायी, स्तंभक, शरीरातील ग्रंथींना सक्षम करणारे, कृमीनाशक, दमा, खोकला, रक्तदोषनाशक, मासिक पाळी नियमित करण्यास उपयुक्त, कफ, पित्त, वात दोषनाशक, शरीरातील गाठींचा नाश करणारे, जळजळ थांबविण्यास विविधप्रकारे उपयुक्त आहे.

कांचनची फुले गुलाबी/पांढरी/पिवळसर अशी तीन प्रजातीत असतात. चवीला मधूर व पचनसंस्थेला उपयुक्त असून साली प्रमाणेच फुलाचे गुणधर्म आहेत. फुले सेंद्रिय गुळात अथवा खडीसाखरेत मिसळून केलेला गुलकंद सर्व प्रकारे लाभ देतो.कांचनाच्या कळ्या वाळवून ठेवता येतात. या थंड, शीतल, स्तंभक असून मुळव्याध, अमांश, अतिसार, जखमा भरण्यासाठी व  गंडमाळावर उपयोगी आहेत. 

       
कांचनाच्या फुले,कळ्या व साल गोमूत्रात मिसळून केलेला गोमूत्र अर्क सर्वतोपरी लाभदायक असल्याचा माझा अनुभव आहे.कांचनाची झाडे  सहजगत्या जवळपास उपलब्ध असतात. त्यांची ओळख करून घ्या व शरीरस्वास्थ्यासाठी त्याचा वापर करा.

      
कर्नाळा चॅरिटेबल ट्रस्टच्या पर्यावरण साक्षरता उपक्रमात सहभागी व्हा. 

कर्नाळा चॅरिटेबल ट्रस्ट, पुणेच्या विद्यमाने पर्यावरण साक्षरता मोहिमेंतर्गत प्रसारित.
लेखक : चंद्रकांत शहासने, पुणे.
निसर्गोपचारक.  मोबाईल ९८८१३७३५८५
close