shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

तेजप्रुथ्वी ग्रुपची इदांपुर तालुका आणि सोलापूर शहरातील पदाधिकारी निवड .

तेजप्रुथ्वी ग्रुपची इदांपुर तालुका आणि सोलापूर शहरातील पदाधिकारी निवड .
 इंदापूर प्रतिनिधी:  तेजपृथ्वी ग्रुपने इंदापूर रेस्ट हाऊस येथे , बहुजन मुक्ती पार्टी चे राष्ट्रीय महासचिव ॲड. राहुल मखरे,कुस्तीगीर संघाचे पुणे जिल्हा सदस्य महेंद्र  रेडके, भगवान कोळेकर यांच्या उपस्थित तेजप्रुथ्वी  ग्रुपच्या पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली .

यामध्ये इंदापूर तालुका अध्यक्ष पदी संसर निंबोडी येथील सामाजिक कार्यकर्ते राहुल नाकाडे, इंदापूर तालुका महिला अध्यक्ष पदी सौ अर्चना मधुकर गोरड, इंदापूर तालुका कार्याध्यक्ष पदी तानाजी हेगडकर यांची निवड करण्यात आली.
 तसेच तेजप्रुथ्वी ग्रुप आत्ता सोलापूर जिल्ह्यातील आपले सामाजिक कार्य वाढवणार असल्याने सोलापुर  शहर अध्यक्षपदी  संपादक श्री सुनील जोगदंडकर यांची निवड केली .

 यावेळी  राहुल मखरे, महिंद्र  रेडके, भगवान कोळेकर यांनी पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले.  नवीन पदाधिकार्‍यांच्या वतीने अर्चना गोरड,  व सोलापूर जिल्ह्याच्या वतीने सुनील जोगदंडकर यांनी आपली तेजप्रुथ्वी ग्रुपच्या पदाधिकारी पदी निवड केल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.  यापुढे तेजप्रुथ्वी ग्रुपच्या माध्यमातून गोरगरीब लोकांचे हित  डोळ्यासमोर ठेवून समाजातील तळागाळातील लोकांना मदत करू असे आश्वासन दिले . 
यावेळी नानासाहेब खरात यांनी तेज पृथ्वी ग्रुपचे ध्येय, धोरणे व सामाजिक विचार मांडले.

या कार्यक्रमास तेजप्रुथ्वी  ग्रुपच्या संस्थापक अध्यक्षा अनिताताई खरात, उपाध्यक्ष गणेश  शिंगाडे, कार्याध्यक्ष संपत पुणेकर,  वशिम शेख,  डोनाल्ड शिंदे, संदीप रेडके, रुपेश वाघमोडे अमोल कोकरे व इतर तेजप्रुथ्वी  ग्रुपचे सदस्य उपस्थित होते.
close