शिर्डी एक्स्प्रेस लाईव्ह वृत्तसेवा राहुरी तालुका प्रतनिधी- दिपक हरिश्चंद्रे
राहुरी: तालुक्यातील धामोरी खुर्द येथील भूमिपुत्र आणि अहमदनगर शहरातील मॅककेअर सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल आणि आरोग्य विभाग अहमदनगर या हॉस्पिटलचे संचालक नगर शहरातीलच नव्हें तर संपुर्ण महाराष्ट्रात सुप्रसिद्ध कॅन्सर तज्ज्ञ अशी ओळख असलेले डॉक्टर सतिश सोनवणे (Oncologist ) यांच्या पुढाकारातून काहि दिवसांपूर्वी निधन झालेले धामोरी लिफ्ट योजनेचे आद्य प्रवर्तक, तसेच माजी खासदार प्रसादरावजी तनपुरे साहेब यांचे अतिविश्वासू कै. धोंडीभाऊ सोनवणे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ स्वखर्चाने व आरोग्य विभाग अहमदनगर, उंबरे यांच्या सहकार्याने आपल्याच धामोरी गावातील ग्रामस्थांचे शंभर टक्के लसीकरण पूर्ण करण्याचे उदिद्ष्ट ठेवले आहे. लसीकणाच्या आगळ्यावेगळ्या उपक्रमाबद्दल डॉ. सोनवणे यांनी स्व खर्चातून उचललेया या उपक्रमाचे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे.
आपल्याच गावातील प्रत्येक नागरिकाचे लसीकरण करण्यासाठी धामोरि येथील भूमिपुत्र सरसावले आहेत. डॉ. सोनवणे यांनी कै. धोंडीभाऊ सोनवणे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ आरोग्य विभाग अहमदनगर , उंबरे व मॅक केअर हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवारी 4 सप्टेंबर रोजी गावातील जिल्हापरिषद प्राथमिक शाळायेथे शंभर टक्के लसीकरणाचे उदिद्ष्ट साध्य करण्यासाठी शिबिराचे आयोजन केले होते.अध्यक्षस्थानी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संदीप सांगळे, मॅककेअर हॉस्पिटल चे संचालक डॉ. प्रशांत पटारे, डॉ. अविनाश जाधव, सरपंच सुनीताताई पवार, उपसरपंच मच्छिंद्र सोनवणे, दत्तात्रय सोनवणे, डॉ. निलेश उगले, बाबासाहेब सोनवणे, भाऊसाहेब जाधव, ग्रामसेविका वाघ यांच्यासह परिसरातील मान्यवर उपस्थित होते.
या शिबीराच्या पहिल्याच दिवशी बाहेरगावी गेलेल्या नागरीकांव्यतिरिक्त गावातील 18 वर्ष वयाच्या पुढील सर्वांचे लसीकरण करण्यात आले. विशेष बाब म्हणजे या वेळी ज्यांचा पहिला डोस झालेला आहे त्यांना दुसरा डोस दिला आणि त्यानी लस घेतलीच नाही त्यांना पहिला डोस दिला. एकीकडे तासनतास रांगेत उभे राहूनही लस मिळत नसतांना शेतकरी, गृहिणी यांना घरचे सगळे कामं सोडून सकाळीच आरोग्य केंद्रात जावे लागत होते नंबर लावावा लागतो परंतु धामोरी खुर्द गावातील सर्व ग्रामस्थांना आपल्याच गावात अतिशय कमी वेळेत आणिदोन्ही प्रकारची लस मिळाल्यामुळे ग्रामस्थांनी आनंद व्यक्त केला आणि कौतुक देखील केले आहे
डॉ. सोनवणे हे अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील आरोग्य परिषदांमध्ये सहभागी झालेले आहेत. करोना विषयक टास्क फोर्समध्ये काम करून आरोग्य विभागाला नेहमीच वेळोवेळी मार्गदर्शन करत असतात. डॉ. सोनवणे यांनी लासिकरणाबाबत जनतेला फक्त आवाहन न करता आपल्या भूमीतील शेतकरी, विद्यार्थी, आणि ग्रामस्थ यांचे स्व खर्चाने लसीकरण करण्याचा निर्णय घेत समाजापुढे नवीन आदर्श निर्माण केला आहे. यावेळी डॉ. सांगळे यांनी डॉ. सोनवणे यांच्या उपक्रमाचा आदर्श समोर ठेवत इतरांनीही आपल्या गावात असा प्रयोग करणे गरज आहे. डॉ. पटारे यांनी धामोरी खुर्द गावातील ज्या व्यक्तींचे लसीकरण होणे बाकि आहे अशा सर्व व्यक्तींनी अहमदनगर शहरातील मॅक- केअर हॉस्पिटलमध्ये येऊन मोफत लस घ्यावी असे आवाहन केले.
यावेळी त्र्यंबक सोनवणे, रावसाहेब सोनवणे, रामनाथ सोनवणे, मच्छिंद्र सोनवणे अभय सोनवणे, रामनाथ शिंदे, संदीप सोनवणे, दिनकर गायके, बापूसाहेब जाधव, खंडू पाटील जाधव, सतीश हरिश्चंद्रे, गोरख जाधव, विकास हरिश्चंद्रे, देवराम खेडेकर, सचिन सोनवणे, शुभम सोनावणे, सोमनाथ काल्हापुरे आदी गग्रामस्थ उपस्थीत होते.
Shirdi Express Live#करीता बातम्या🗞️ आणि जाहिराती साठी संपर्क @दिपक हरिश्चंद्रे , खडांबे (राहुरी- तालुका प्रतिनिधी )📲7350591600

