कंधार :नांदेड कंधार गऊळ येथे साहित्य सम्राट आण्णा भाऊ साठे यांचा पुतळा हटवल्याप्रकरनी व आण्णा भाऊ प्रेमिंवर मातंग समाजाच्या आया बहिणीवर केलेल्या अमानुष हल्ल्याच्या निषेधार्थ आज गऊळ येथे अभूतपूर्व हजारो मातंग समाजाच्या उपस्थित प्रस्तापित जातीयवादी लोकांविरुद्द्ध एल्गार पुकारला. कोणतीही पूर्वतयारी नसताना सचिनभाऊ साठे आपल्या एका पोस्ट ला प्रतिसाद देत मातंग समाजाने तुमच्या सोबत फौज उभी केली.भल्या भल्या नेत्यांना तुमच्या या अफाट गर्दीत सामावून घ्यावे लागले.
ही एकतेची ताकद आपल्या सोबत इतिहासात पहिल्यांदाच पाहत आहोत.मातंग समाजाने आपल नेतृत्व स्वीकारलं आहे.आण्णा भाऊंचा "फकिरा" तुमच्या रूपाने पुन्हा एकदा समाजाला मिळाला आहे. आजचा आपला आक्रमक पणा इथल्या प्रस्तापित जातीयवादी मानसिकतेच्या व्यवस्थेला चिरडून टाकला आहे.तुमच्या एका फेसबुक पोस्ट ला पाहून एवढा जत्था येतोय, तुम्हाला बारा हत्तीच बळ देऊन इथल्या व्यवस्थेच्या पेकाटात लाथ घालून न्याय मिळवून देण्यासाठी सचिन भाऊ साठे यांचं नेतृत्व स्वीकारत आहे.
तुमच्यात ती धमक आज आम्ही पाहिली." आण्णा भाऊ साठे यांचा पुतळा जशास तसे सन्मानाने वाजत गाजत 8 दिवसात ज्या ठिकाणी होता त्याच ठिकाणी नाही लावला ते 1लाखाच्या जमावसोबत येऊन होत्याच नव्हतं करीन याला संपूर्ण जबाबदार इथल प्रशासन असेल " हा तुमचा एल्गार पाहून प्रशासनाची पळता भुई थोडी झाली आहे.
येणाऱ्या निवडणुकीत इथल्या व्यवस्थेला संरक्षण देणाऱ्या राजकीय पुढाऱ्यांना त्यांची जागा दाखवून देणार आहात. जातीयवादी राजकीय पुढाऱ्यांचा माज आपल्या नेतृत्वात उतरणार आहे. एसपी ला फोन लावून आपण बोललात लवकरच ज्या ज्या कामचुकार पोलिसांनी आमच्या आया बहिणीवर नको त्या ठिकाणी लाठी हल्ले केलेत, त्या पोलीस अधिकाऱ्यांना तात्काळ निलंबित करण्यात यावे हा आक्रमक पवित्रा आपण घेतलात.एसपी साहेबांनी आपणास त्या नराधम पोलिसांना निलंबित करण्याच आश्वासन दिले आहे. अन्यायाविरुद्ध पेटून उठून समाजाला एकत्र करत न्याय देण्यासाठी आलेला मी "फकिरा" मी सचिन भाऊ आपल्यात पाहिला. गट तट विसरून सचिन भाऊ आपल्या एका पोस्ट ला पाहून अनेक संघटनेचे नेते आपल्या गर्दीत स्वतः ला सामावून घेतले आहेत.
येणाऱ्या काळात तुमच्यात म्हणजे मानवहीत लोकशाही पक्षात सामाऊन घेतील. अन् आपल्या एका हाकेत इथल्या महाराष्ट्राच्या राजकारणाची दिशा नक्कीच बदलणार आहे.हा विश्वास समस्त मातंग समाजाला व महाराष्ट्राला आलेला आहे.आम्ही जे स्वप्नातही विचार केला नव्हता ते आज आपण सत्यात उतरलात.तुम्हाला लढण्याचं बळ मिळो.मातंग समाजाला वाली नव्हता आपल्या रूपाने पुन्हा एकदा आण्णा भाऊंच्या कुटुंबातच जन्म घ्यावा लागला." फकिरा" जन्माला आलाय ते तुमच्या रूपाने !.....आदरणीय सचिनभाऊ या समाजाला आपणच आवरा...सावरा... राजकीय दिशा द्या....न्याय द्या......" मातंग समाजाचा एकमेव नेता आज सचिन भाऊ तुमच्या रुपात आम्हाला मिळाला "
सचिन भाऊंच्या एका हाकेत...येणाऱ्या काळात राजकीय चित्र बदलणार ! इथल्या राजकीय व्यवस्थेला सुरुंग लागणार ! ....ये पक्का हैं! चलो लढेंगे ! जितेंगे !!
जय लहुजी ! जय भीम! जय आण्णा भाऊ! जय फकिरा !!
.........................
आकाश वाडेकर
युवा प्रवक्ता तथा
सोशल मिडिया प्रसिद्धी प्रमुख मा.लो.पा.

