केंद्र सरकार हे व्यापाऱ्यांचे सरकार - मंत्री विजय वडेट्टीवार.
शेतकरी, भटके विमुक्त, भाजपाचे दबावतंत्र तसेच काँग्रेसच्या इंदापूर विधानसभा जागे बाबत आज इंदापूर येथील शासकीय विश्रामगृहात नियोजित दौऱ्यामध्ये मंत्री विजय वडेट्टीवार यांनी विविध विषयावर चौफेर चर्चा पत्रकारांशी बोलताना केली.
इंदापूर प्रतिनिधी:राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार व विधान परिषदेचे माजी आमदार रामराव वडकुते हे मंगळवारी (दि. ३१) रोजी नियोजित दौऱ्यावर होते.
इंदापूर शासकीय विश्रामगृह येथे पत्रकारांशी संवाद साधताना मंत्री वडेट्टीवार म्हणाले की,
केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या प्रश्नाबाबत किती संवेदनशील आहे. गेली ९ महिने आपण पहात आहात. शेतकरी हक्कासाठी लढतोय त्याच्याकडे लक्ष नाही उलट त्यांच्यावर गोळीबार आणि लाठीचार्ज करायसाठी सरकार सरसावले आहे.केंद्र सरकार हे व्यापाऱ्यांचे सरकार आहे. याची मानसिकताही व्यापारी मानसिकता आहे .याबरोबर हा संपूर्ण देश विकायला काढला आहे. एकही शासकीय संस्था यांना ठेवायची नाही लोस मधील संस्था ठीक आहे. परंतु नफ्यातील संस्था विकणे सुरू आहे. त्यामुळे मला असे वाटते की, यासरकारला शेतकऱ्याचे काही देणे घेणे नाही .
तसेच वडेट्टीवार पुढे म्हणाले की,भटके-विमुक्त हा कष्टकरी घाम गाळणारा उपेक्षित माणूस आहे. आयुष्यात त्यांना हक्काचं घर मिळालं नाही. या भटक्यांना आयुष्यभर भटकत राहिला त्यामुळे त्यांना स्वतःचं घर ना दार ,ना खिडक्या अशा अवस्थेत जगतोय .तो त्याच्या पोराच्या शिक्षणाचा पत्ता नाही. त्याच्या पोराची नोंद नाही. जातीचे दाखले मिळत नाहीत. कुठे राहतो कुठे कुठे जमतो काय करतो याची दखल नाही. त्यांची व्यथा समजून घेण्यासाठी गेलो तो अन्याय? आणि परवा आशीर्वाद घेत फिरले. डिझेलचे ,पेट्रोलचे गॅसचे आशीर्वाद घेतले ते कोणाला आवडले. आम्ही सगळ्यांना आव्हान केले कि,या सगळेजण भटक्यांना न्याय देऊ, उपेक्षितांना विमुक्तांना न्याय देऊ, ओबीसीतील लोकांना न्याय देऊ. ही भावना असून असा मोठा वर्ग ज्यांचे५० , ६० ते ६५ टक्के हा समाज आहे. महाराष्ट्रात या लोकांसाठी जर त्यांना जागृत करून त्यांच्या हक्कासाठी काम करावं.
सत्ता दिल्यानंतर भारतीय जनता पक्ष विचलित झालेला आहे. त्याला कुठल्याही परिस्थितीमध्ये सत्तेमध्ये यायचे आहे. त्यामुळे ईडी, सीबीआय असेल या यंत्रणेचे दुरुपयोग चालले आहे. आणि दुरुपयोग करून दबावतंत्राचा वापर करून पुन्हा सत्ता कशी मिळवता येईल हा ही उद्देश आहे. दुसरा उद्देश असा की या सगळ्यांमध्ये अशा प्रकारचे दहशतीचे वातावरण निर्माण करून शिवसेनेला असेल किंवा महाविकास आघाडीला त्यांना बदनाम कसं करता येईल हा त्याच्या मागचा दुसरा उद्देश आहे. खरंतर एकही भारतीय जनता पक्षाच्या नेत्या वर कारवाई होत नाही. त्यांच्या पाच वर्षाच्या सरकार मध्ये किती मंत्र्यावर आरोप झाले. कोणालाही शिवाय अशी चौकशी झाली नाही. सुडाच्या भावनेने बदल्याच्या भावनेने असं राजकारण महाराष्ट्रात कधीच नव्हतं. महाराष्ट्र मध्ये भारतीय जनता पक्षाने बदला घेण्याचे राजकारण केले आहे. ही द्वेषाची परंपरा भविष्यात सगळ्यांसाठी घातक असणार आहे .सत्तेचा मुकुट कोणीही घालून येत नसते. सत्ता जाति येते. आज तुम्ही ज्या पद्धतीने वागता उद्या दुसरे त्या पद्धतीने वागतील. यातून लोकांना न्याय मिळेल का? त्यांचे प्रश्न सुटतील का? खरं तर यासाठी सगळ्यांनी प्रयत्न केला पाहिजे. सत्तेचा उपयोग सत्ताधारी आणि विरोधकांनी जनतेच्या प्रश्नासाठी भांडले पाहिजे. हे मात्र खुर्चीसाठी भांडत आहेत हे महाराष्ट्राचे दुर्दैव आहे. अशा शब्दात त्यांनी आपले मत व्यक्त केले.
यावेळी विधान परिषदेचे माजी आमदार रामराव वडकुते,काँग्रेसचे तालुकाध्यक्ष स्वप्नील सावंत,तालुका काँग्रेस उपाध्यक्ष आबासाहेब निंबाळकर, इंदापूर शहराध्यक्ष चमनभाई बागवान,डॉ.संतोष होगले, इंदापूर विद्यार्थी संघटना अध्यक्ष शंभूराजे साळुंखे, पुणे जिल्हा सरचिटणीस जकिरभाई काजी, निवास शेळके, महादेव लोंढे, दत्तात्रेय देवकर यांसह अन्य उपस्थित होते.
*इंदापूर ची विधानसभा १०० टक्के काँग्रेसच लढवणार.. विजय वडेट्टीवार.*
इंदापूर येथे विजय वडेट्टीवार म्हणाले की, इंदापूर विधानसभा काँग्रेस पक्ष १०० टक्के लढवणार तसे आमचे प्रदेशाध्यक्ष म्हणतात स्वतःचा पक्ष आणि ताकद वाढवणे हे ज्या त्या पक्षाचे काम आहे आणि आमचे प्रदेशाध्यक्ष त्या पद्धतीने कामाला लागले आहेत स्वबळ हे येणाऱ्या काळाच्या परिस्थिती नुसार ठरेल .येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये आमची भूमिका ठरलेले आहे. महाराष्ट्रात काँग्रेस पक्षाला जोरदार पाठिंबा मिळतो आहे. आणि विदर्भात सुद्धा चांगला पाठिंबा आहे हे प्रत्येक ठिकाणी प्रदेशाध्यक्ष फिरतात रात्री बारा बारा वाजेपर्यंत लोक सभेला उपस्थित राहतात यावरून पक्ष मजबुतीने उभा राहतोय हे महाराष्ट्र पाहत आहे.

