नद्या आजारी पडल्या नंतर आपल्याला कोणीही वाचवु शकणार नाही-जलपुरुष मॕगसेस पुरस्कार विजेते राजेंद्रसिंह राणा .
इंदापूर प्रतिनिधी: आम्ही नद्यांना आई म्हणत असेल तर तीच्या बरोबर तस आचारण केले पाहिजे.नाही तर नद्या आजारी पडल्या नंतर आपल्याला कोणीही वाचवु शकणार नाही.नद्या स्वच्छ असतील तरच आपण स्वच्छ राहु असे मत जलपुरुष मॕगसेस पुरस्कार विजेते राजेंद्रसिंह राणा यांनी व्यक्त केले.
इंदापूर तालुक्यात शेळगाव येथील श्री संत मुक्ताबाई मंदिराच्या सभागृहात जलसंधारण राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते व राजेंद्रसिंह यांच्या प्रमुख उपस्थितीत इंदापूर तालुका जलसाक्षरता अभियानाचा प्रारंभ करण्यात आला.या वेळी श्री राणा प्रमुख वक्ते म्हणुन बोलत होते.
श्री राणा पुढे म्हणाले, येथील उजनीत येणारे प्रदुषीत पाणी कमी होण्या ऐवजी वाढत आहे.उजनीला ह्रदयरोगाचा आजार झाला आहे आणि सरकार माञ त्यावर दातांच्या डाॕक्टरांकडुन उपचार करत असल्याचा आरोप त्यांनी केला.
मंत्री ना. भरणे म्हणाले, भविष्याचा विचार करता प्रत्येकाने पाण्या बाबत जागृत राहिले पाहिजे.यासाठी लोकसहभाग महत्वाचा आहे. तालुक्यात जलसंधारणाची कामे आपण प्राधान्याने राबविणार आहोत.
या वेळी यशदाचे उपसंचालक डाॕ.मल्लीनाथ कलशेट्टी, कृषी विभागाचे निवृत्त उपसंचालक उदय देवळानकर, यशदाचे जलसाक्षरता विभागाचे संचालक आनंद पुसावळे, निवृत्त कार्यकारी संचालक डाॕ.सुमंत पांडे, नरेंद्र चुड, तहसीलदार श्रीकांत पाटील, गटविकास अधिकारी विजयकुमार परीट यांनी मार्गदर्शन केले.
या वेळी सरपंच रामदास शिंगाडे, अॕड. लक्ष्मणराव शिंगाडे, अॕड.अशोक शिंगाडे, अॕड.सचिन राऊत यांच्यासह जलसेवक उपस्थित होते.प्रास्ताविक
जलदुत भाजनदास पवार यांनी केले.सुञसंचालन बापुराव जाधव व रामदास पवार यांनी केले व आभार मनोहर चांदणे यांनी मानले.
तत्पुर्वी सकाळी कडबनवाडी येथे शिवार फेरीचे आयोजन केले होते.

