shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

शेटफळ हवेली तलाव पूर्ण क्षमतेने भरण्यात यावा... इंदापूर तालुका शिवसेनेच्या वतीने कार्यकारी अभियंता यांना निवेदन देऊन केली मागणी.

शेटफळ हवेली तलाव पूर्ण क्षमतेने भरण्यात यावा... इंदापूर तालुका शिवसेनेच्या वतीने कार्यकारी अभियंता यांना निवेदन देऊन केली मागणी.
इंदापूर प्रतिनिधी: इंदापूर तालुका शिवसेनेच्या वतीने पुणे येथील जलसंपदा विभाग कार्यकारी अभियंता राजेंद्र धोडपकर यांना निवेदन पत्र देऊन शेटफळ हवेली तलावात पाणी सोडून पूर्ण क्षमतेने भरण्याबाबतची मागणी (दि.१६ सप्टेंबर) रोजी करण्यात आली.
इंदापूर तालुक्यातील शेतकरी व  सात गावांच्या पिण्याच्या पाण्याची व्यवस्था असणारी शेटफळ हवेली तलाव हा ब्रिटिश कालीन असून या तलावात पाणी सोडण्याची ची व्यवस्था भाटगर धरणावर अवलंबून असून भाटगर धरण पूर्ण क्षमतेने भरून झाल्यानंतर  धरणातून  वाहणारे पाणी या पाण्यावरती हे तलावा  भरण्यात येते . सध्याच्या स्थितीत भाटगर धरण शंभर टक्के भरलेले असून वाहणाऱ्या पाण्याला द्वारे अद्याप पर्यंत शेटफळ हवेली तलावात पाणी सोडण्यास चालू झालेले नाही.  या तलावावर पिण्याच्या पाण्याची व शेती सिंचन व्यवस्था अवलंबून आहे .व  चालू स्थितीत शेटफळ हवेली तलावात अत्यंत कमी पाणीसाठा उपलब्ध आहे . या स्थितीचा विचार करता  तलावात लवकरात लवकर पाण्याची फिटिंग करून पूर्णक्षमतेने तलाव भरण्यात यावा अशा आशयाचे निवेदनपत्र इंदापूर तालुका शिवसेनेच्या वतीने देण्यात आले.

यावेळी शिवसेनेचे इंदापूर तालुका प्रमुख नितीन शिंदे, तालुका समन्वयक अरुण पवार, इंदापूर शहर प्रमुख  महादेव सोमवंशी, शिवसेना माथाडी कामगार संघटनेचे राजू शेवाळे इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते.

कार्यकारी अभियंता राजेंद्र धोडपकर यांना दूरध्वनी मार्फत विचारले असता त्यांनी सांगितले की,  चालू असलेले सिंचन आवर्तन संपल्यानंतर लवकरात लवकर शेटफळ तलावामध्ये पाणी सोडण्यास सुरुवात करण्यात येणार आहे. तरी शेटफळ तलाव आंतर्गत लाभधारकांनी पाणीपट्टी भरून सहकार्य करावे असे त्यांनी  सूचित केले .
close