shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

महिलांसाठी प्रतिकूल व अतिदुर्गम भागात वाडीवर काम करणाऱ्या सौ. अपर्णा अमोल गुंड..!!

त्यांच्या कार्याचा गौरव करणारी थोडक्यात माहिती     


राजेश बाष्टे अलिबाग प्रतिनिधी :-

                                                             

  नाव - सौ. अपर्णा अमोल गुंड.          शिक्षण  - बी. ए.- बी एड़


कार्यरत-

रा.जि .प. प्राथमिक शाळा वाघाचीवाडी, केंद्र- वाजे,पनवेल


आपल्या मनात जर जिदद असेल तर नक्कीच आपण अशक्य ते शक्य करू शकतो. पण त्यासाठी हवीय जिदद, चिकाटी काम करण्याची प्रबळ इच्छाशक्ती, ध्येयाने झपाटले पाहिजे. जोपर्यंत आपल्या कामाची तहान भागत नाही, अगदी तोपर्यंत.. आणि ज्ञानदानाची ग्रहण करण्याची तहान मला तरी वाटते की कधीच भागत नाही. किंबहुना आपण याबाबतीत संतुष्ट समाधानी होत नाही मी तर असे म्हणेन की ,याबाबतीत सदैव असमाधानी राहून सदैव ज्ञानदानाचे आणि ज्ञानग्रहणाचे पवित्र कार्य करत राहिले पाहिजे. अशाच एका ज्ञानज्योतीच्या कार्याची ओळख आपल्याला करून घ्यायची आहे.



सौ. अपर्णा अमोल गुंड (श्रीम: अपर्णा प्रल्हाद पाटील )

यांचे मुळगांव ऐतिहासिक वारसा लाभलेले चरी होय. त्यांचे बालपण अत्यंत आर्थिक परिस्थिती बेताची अशा सामान्य कुटुंबात गेले.वडील श्री प्रल्हाद  पाटील सामान्य नोकरी करत होते आता रिटायर्ड आहेत व आई सौ. जयश्री पाटील गृहिणी आहेत. मोठा भाऊ अमोल पाटील सध्या पोलिस क्षेत्रात देशसेवा करत आहे व बहिण अस्मिता पाटील उत्तम

अशी गृहिणी आहे.

🔹कार्य  :-- सर्वात पहिली शाळा टेंभोडे तेथे शिक्षण सेवक पदावर 3 वर्षे कार्य केले व तदनंतर सन २००६ साली कळंबोली केंद्रातच केंद्रशाळा कळंबोली येथे त्याच उत्साहाने पुढे कार्य चालू ठेवले. कळंबोली शाळेत काम करताना केंद्रप्रमुख आदरणीय श्री. रा. गो पाटील सर ज्यांनी नेहमीच मार्गदर्शन केले. प्रशासन, नियोजन वेळ, टापटीपपणा, अचुकता, नियमितपणा या सर्व गोष्टी चे मार्गदर्शन मिळाले.

शाळेत असताना विदयार्थ्यासाठी विविध नाविन्यपूर्ण उपक्रम राबविले  वकृत्व निबंध, रांगोळी क्रिडास्पर्धा अशा अनेक स्पर्धेत विद्यार्थ्यांनी भरघोस यश मिळविले आहे. स्कॉलरशीप, नवोदय इतर स्पर्धापरीक्षा मध्ये सुद्धा विदयार्थ्यांनी प्राविण्य  मिळविले आहे. तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन सहभाग शैक्षणिक साहित्य निर्मितीत सहभाग ,शाळा सुधार योजना सहभाग, माता पालक शिक्षक-पालक, प्रबोधन अशा अनेक उपक्रमांतून शाळेची गुणवत्ता वाढीसाठी प्रयत्न केले व त्याचेच यश म्हणून "रायगड जिल्हा गुणवत्ता  विकास कार्यक्रम"यामध्ये शाळेस संपूर्ण जिल्हयातून प्रथम क्रमांक प्राप्त होऊन बक्षिस मिळविले. 

कळंबोली शाळेत असताना सामाजिक कार्यातही तितक्याच हिरहिरीने सहभाग घेतला. कळंबोली शाळेतला विद्यार्थी . कु. हर्षवर्धन राठोड या विदयार्थ्यांचे दोन्ही डोळ्याचे मोतीबिंदूचे ऑपरेशन करण्यासाठी स्वतः पुढाकार घेवून करून त्या विद्यार्थ्यांस दृष्टी देण्याचे पवित्र  कार्य केले. तसेच वेळोवेळी गरीब गरजू विदयार्थ्यांना वह्या, पेन, पेन्सिल दप्तर यांचे सढळ हस्ते वाटप केले. तसेच स्व-खर्चाने वर्गही डिजिटल करण्यास पुढाकार घेतला.

तंत्रज्ञानाची अत्यंत आवड असणाऱ्या  सौ अपर्णा गुंड यांनी तालुक्यात शाळेला नेहमी अग्रेसर ठेवण्यात यश आले. शाळेचे यू ट्यूब चैनेल, शाळेचा ब्लॉग, शाळेची सरल प्रणाली माहिती यात नेहमीच त्या पुढे असायच्या व आजही तंत्रज्ञान व त्यांचे यश यांचे जवळचे नाते आहे.

तदनंतर समायोजनाने चिंचपाडा शाळेत ६ महिने कार्य केले. तेथे सुद्धा विविध उपक्रम राबवून विद्यार्थ्यांना शिक्षणाबद्दलची गोडी निर्माण केली.  ६ महिने कार्यकरून जी. आर नुसार बदल्यांच्या प्रोसेस मध्ये त्यांना विस्थापित व्हावे लागले. त्यात त्यांना पनवेल तालूका सोडून पेण तालुक्यातील वरसई केंद्रात वाशिवली शाळेवर काम करतानाही त्यांनी शिक्षणातली नाविन्यता सोडली नाही. तेथे ही नाविन्यपूर्ण उपक्रम राबविले. तेथे त्यांना पुन्हा बदलीची संधी प्राप्त झाली. व त्या पनवेल तालुक्यात महिलांसाठी प्रतिकूल असलेल्या व अतिदुर्गम भागात असलेल्या वाघाची वाडी या शाळेत हजर झाल्या. जेथे वाहनांची सोय नाही. मुळ  रस्तापासून 2km आत चालत जावे  लागते.अशा ठिकाणी अत्यंत आनंदाने शिक्षणाचा वसा  घेउन उल्लेखनीय कार्य चालू ठेवले. माथेरानच्या पायथ्याशी वसलेले व निसर्गसौंदर्याचे वरदान लाभलेले आदिवासी-ठाकूरवाडी असलेले, वाघाची वाडी गाव.तेथे गेल्यानंतर प्रथम विद्यार्थ्याशी जवळीक साधून त्यांना  मनोसोक्त  बोलते केले. शिक्षणाची गोडी वाढावी उपस्थिती वाढावी म्हणून पथनाटय, कलाविष्कार, प्रबोधन- गृहभेटी, भोंडला उपक्रम माता-पालक मेळावा अभ्यास जत्रा, सहल - परिसर भेट, बालदिन, रांगोळी स्पर्धा,किल्ले स्पर्धा, रंगोत्सव मासिक पाळी उदबोधन, वाचन प्रेरणा दिन, कलाकृती ,पालक सहभाग असे अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम राबवून विद्यार्थ्यांची उपस्थिती वाढवली.  या सर्व उल्लेखनीय उपक्रमाना आदरणीय केंद्रप्रमुख श्री.पी.पी.कोळी सर  यांनी नेहमीच प्रेरणा दिली तसेच गावचे ग्रामस्थ व सहकारी शिक्षक व विद्यार्थी यांचे ही सहभाग लाभले. शाळेचा पट 20 वरून आज 36 वर पर्यंत गेला आहे.

शाळेचा गुणवत्तेचा आलेख उंचावत गेला आहे. केंद्रस्तर, तालुका स्तर, जिल्हा स्तर स्पर्धेमधे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून बक्षीसे मिळवून दिली आहेत.तसेच युनायटेड नेशन ऑफ मुंबई या कंपनीच्या मार्फत हैण्डवॉश स्टेशन व बाथरूम यांचे बांधकाम करुन घेतले. तसेच वेळोवेळी समाजसहभागातून शाळेस विविध वस्तू शैक्षणिक साहित्य पुरवत आहेत.

कोरोनाच्या काळातही सगळीकडे ऑनलाइन शिक्षण चालू होते परंतु या गावात कोणतेच नेटवर्क नसल्याने साधा फोनही लागत नाही अशावेळेस सौ. अपर्णा गुंड यांनी कोरोनाच्या सर्व मार्गदर्शक सूचनांचे पालन करून ऑफलाइन शिक्षण म्हणजेच "शिक्षण आपल्या दारी" द्वारे अखंडपणे शिक्षण प्रक्रिया चालू ठेवली. स्वखर्चाने व स्वतः तयार केलेल्या  'माझा स्व -अभ्यास' पुस्तिका  प्रत्येक विदयार्थ्याच्या घरी जावून देवून ती सोडवून घेतली व आजही गट अभ्यास, मैत्री अभ्यास च्या द्वारे शिक्षण प्रक्रिया चालू ठेवली आहे.

सौ. अपर्णा गुंड यांना रायगड जिल्हा परिषद आदर्श शिक्षक पुरस्कार सन २०२१प्राप्त झाला आहे. तसेच त्यांना रोटरी क्लब ऑफ न्यू पनवेल तर्फे "राष्ट्राचे शिल्पकार पुरस्कार २०१८" तसेच रायगड जिल्हा परिषद क्रीड़ा स्पर्धा  २०१५-१६ कबड्डी स्पर्धा - द्वितीय क्रमांक. क्रिकेट स्पर्धा - द्वितीय क्रमांक पारितोषिक प्राप्त झाली आहेत. केंद्र वाजे पनवेल 'गुणवंत शिक्षिका' कार्य गौरव करण्यात आला आहे.

   

महिलांसाठी प्रतिकूल व अतिदुर्गम अशा वाघाची वाड़ी शाळेवर त्या अतिशय उल्लेखनीय कार्य करत विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधत आहेत.व ह्या कार्यासाठी त्यांना त्यांचे पती श्री.अमोल गुंड व मुलगी अनुष्का व मुलगा अविघ्न या सर्वांची फार मोलाची साथ आहे.त्यांना मिळालेला पुरस्कार हा  सर्व विद्यार्थ्यांचा आहे अस त्या मानतात. त्यांना " रायगड जिल्हा परिषद आदर्श शिक्षक पुरस्कार २०२१" प्राप्त झाल्याबद्दल  ख़ुप अभिनंदन व पुढील वाटचालीस ख़ुप शुभेच्छा💐💐

close