भ्रष्ट तहसिलदार हवेत कशाला - शिवराम पाटील
प्रतिनिधी : संजय वायकर
जळगाव : दि .१५ / जळगाव चे तहसीलदार वैशाली हिंगे यांनी भुसावळ येथे तहसीलदार असताना १९ लाखाचा नजराणा माफ केला.तसे त्यांना आधिकार नसताना. तशी तक्रार तेथील प्रांताधिकाऱ्यांनी केली.पण एक छदाम वसुली झाली नाही . तिच तक्रार आरटीआय एक्टीव्हिस्ट दिपककुमार गुप्ता यांनी केली.तर फक्त चौकशीचे नाटक केले.उलट दिपककुमार गुप्ता यांचेवर विनयभंगाचा गुन्हा दाखल केला.जर भ्रष्टाचाराची तक्रार केली तर विनयभंगाचा गुन्हा दाखल करणे,यातील भ्रष्ट मानसिकता महसूलमंत्री थोरातांच्या लक्षात आली असेलच.
महसूलमंत्री म्हणून थोरात हे खातेप्रमुख आहेत.ती रक्कम तहसीलदार कडून वसुल करून सरकारी तिजोरीत भरली पाहिजे.तहसीलदार वर कारवाई करणे,अपहाराची रक्कम वसुल करणे,बडतर्फ करणे आवश्यक आहे.
तक्रार घेऊन बाळासाहेब थोरातांकडे वेळ घेऊन संगमनेर येथे गेले असता थोरात पळापळ आणि टाळाटाळ करतात.थोरातांनी मंत्री पदाचे भान ठेवले नाही. म्हणून थोरातांच्या कर्तव्यहिनतेबद्दल मंत्रीपदाचा राजीनामा मागितला.
भडगाव तालुक्यातील ५० शेतपाणंद रस्त्यांसाठी प्रत्येकी एक लाख रुपये पालकमंत्री ने मंजूर केले.त्यातील वडजी ते भडगाव हा जुना शेत रस्त्याचा उल्लेखनीय आहे.तहसीलदार माधुरी आंधळे यांनी रस्ता बनवताना कागदावर हेराफेरी करून एक लाख हजम केले. तक्रार केली तर चौकशी अंती अपहार केल्याचे सिद्ध झाले.महसूलमंत्री म्हणून थोरातांनी कारवाई करणे, रक्कम वसुल करणे व बडतर्फ करणे आवश्यक आहे.
अशा भ्रष्ट तहसीलदार कडून अपहाराची रक्कम वसुली करणे आवश्यक होते.म्हणून आम्ही महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांचेकडे तगादा लावला. संगमनेर येथे वेळ घेऊन गेलो असता बाळासाहेब थोरातांनी पळापळ व टाळाटाळ केली.म्हणून आम्ही बाळासाहेब थोरातांच्या मंत्रीपदाचा राजीनामा मागितलेला आहे.
महसूल मंत्री बाळासाहेब थोरातांच्याच जिल्ह्यातील पारनेरचे तहसीलदार ज्योती देवरे यांचेवर रेतीच्या व्यवसायातील ५ कोटी ९४ लाखाचा अपहार केल्याची तक्रार आहे. बाळासाहेब थोरातांनी या तक्रारीकडे जाणिवपूर्वक कानाडोळा केलेला आढळतो.त्यांनी पदाचा वापर करून ताबडतोब कारवाई करणे,अपहाराची रक्कम वसुल करणे ,भ्रष्टाचार केल्याकारणे बडतर्फ करणे आवश्यक आहे .
महसूलमंत्री श्री . बाळासाहेब थोरात हे आपले निहीत,निर्धारित कर्तव्य न करता महसूलमंत्री पद बाळगून आहेत.सोपवलेले कर्तव्य पार पाडत नसतील तर ते महाराष्ट्र सरकारवर ओझे आहे.त्यांचेमुळे महाराष्ट्र राज्याचा महसूल प्रशासनात कालापव्यय होत आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना अपरिहार्य कारणे थोरातांना मंत्रीपदावर ठेवणे मजबुरी असेल तर थोरातांना बिनखात्याचे मंत्री बनवून मानधन देण्यात यावे. कर्तव्यहिन मंत्रीचा राजीनामा घ्यावा,अशी आमची मागणी कायम आहे.
जळगाव जिल्ह्यात राष्ट्रवादी, शिवसेना पक्षाचे मंत्री आलेत.सरकारी तिजोरीतून प्रवास खर्च केला. तरीही ते आपल्याच पक्षातील भाऊगर्दीत राहिले. हे आक्षेपार्ह आहे.मंत्री पदाला अशोभनीय आहे.त्यांनी शपथ घेतल्याप्रमाणे ते सर्वसामान्य महाराष्ट्रातील जनतेचे प्रतिनिधित्व करण्यात अपयशी ठरलेले आहेत.अशा मंत्र्यांचा आम्ही निषेध करतो.
महसूलमंत्री थोरात यांनी जळगाव जिल्हा दौऱ्यावर सरकारी खर्चाने येत असतील तर फक्त पक्षाच्या भाऊगर्दीत वेळ घालवू नये.तसे आवश्यक वाटत असल्यास त्यांनी मंत्री पदावरून सुटी मंजूर करून घ्यावी. वैयक्तिक खर्चाने दौरा ,यात्रा करावी.जर सरकारी खर्चाने दौरा करीत असतील तर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात सार्वजनिक सभागृहात जनतेशी संवाद करावा.संबंधित खात्याबाबत प्रत्येक तक्रारीचा जबाबदारीने निपटारा करावा.तितका अभ्यास, तितकी क्षमता नसेल तर मंत्री पद बगलेत धरणे म्हणजे जनतेची फसवणूक करीत आहात,असा निष्कर्ष घेऊ.बाळासाहेब थोरात महसूलमंत्री असताना महाराष्ट्रातील महसूल खात्यातील भ्रष्टाचार व कामचोरी बद्दल, पदाची जबाबदारी म्हणून आम्ही बाळासाहेब थोरात यांना जबाबदार समजतो.
महाराष्ट्रातील मंत्र्यांनी स्वतः शिस्तीने,शिष्टाचाराने काम करणे आवश्यक आहे.तरच जनतेकडून सन्मानाची अपेक्षा धरावी.मंत्रीपद हे वैयक्तिक वसुलीचे साधन असू नये.
महसूलमंत्री बाळासाहेब थोरात महसूल खात्याबाबत कर्तव्यदक्ष नाहीत, याबाबत सबळ कारणे आहेत.नोंद घ्यावी.मंत्र्यांनी जबाबदारीने वर्तन करावे.खात्याबाबत कर्तव्यदक्ष असावे. आम्ही जागृत जनता याची दखल घेत आहोत.मंत्र्यांनी दखल घ्यावी.
....शिवराम पाटील.
९२७०९६३१२२.
महाराष्ट्र जागृत जनमंच.

