shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

शिर्डीलगत असलेल्या शेती महामंडळाच्या जमिनीवर औद्योगिक वसाहत उभी करावी : निलेश कोते



शिर्डी । प्रतिनिधी :-
शिर्डी आंतरराष्ट्रीय दर्जाचा शिर्डी सारख्या तीर्थक्षेत्रामुळे विमानसेवा, रेल्वेमार्ग, समृद्धी महामार्ग अशा अनेक पूरक सुविधा उपलब्ध झाल्या आहे. मात्र महत्त्वाची बाब म्हणजे राहाता तालुक्यामध्ये शिर्डी परिसरालगत शासनाच्या शेती महामंडळाच्या शेकडो एकर जमिनी या बिगरकामी आणि पडीक असून याच शेती महामंडळाच्या जमिनीवर कायदेशीर बाबींची पूर्तता करून औद्योगिक वसाहत उभी करावी, 

अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगराध्यक्ष निलेश कोते यांनी शिवसेनेचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्याकडे केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी उपनगराध्यक्ष निलेश कोते यांनी शिवसेनेचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्याकडे राहाता तालुक्यात बेरोजगारांसाठी रोजगार उपलब्ध व्हावा यासाठी औद्योगिक वसाहत निर्माण करावी याविषयी सखोल चर्चा केली आहे.

 यामध्ये त्यांनी पुढे त्यांनी म्हटले आहे की, राहाता तालुका ही संतांची भूमी म्हणून ओळखली जाते. यात राहाता तालुक्यामध्ये शिर्डीचे साईबाबा या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या तीर्थक्षेत्राचा समावेश आहे. याच सदगुरु साईबाबांच्या आधारावर आजूबाजूच्या बाजारपेठा स्थिरावलेल्या आहेत. राहाता, कोल्हार व लोणी याच बाजारपेठा तालुक्यातील तेजीत असणाऱ्या बाजारपेठा म्हणून नावारूपाला आलेल्या आहे.
close