shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

"मानव संरक्षण समिती नवी दिल्ली" व "आपलं घरटं सामाजिक बहुद्देशीय सामाजिक संस्था" यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यस्तरीय उखाणे स्पर्धेचा निकाल जाहीर...!

औरंगाबाद । प्रतिनिधी (सतिश लोखंडे) : 
मानव संरक्षण समिती नवी दिल्ली व सोलापूर जिल्हा विभाग व आपलं घरटं सामाजिक बहुद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीने घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय आँनलाईन उखाणे स्पर्धेचा निकाल जाहीर करण्यात आला.हि स्पर्धा प्रथम, द्वितीय, तृतीय,व उत्तेजनार्थ असे चार विभाग ठेवण्यात आले होते.व सहभागी स्पर्धकास प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.व ह्या राज्यस्तरीय घेण्यात आलेल्या  उखाणे स्पर्धेस महाराष्ट्रातुन असंख्य महीलांनी  सहभाग नोंदविला होता.


यामध्ये प्रथम विभागातुन : १) ज्योत्स्ना गायकवाड. अकलूज,२) कांचन बावळे.माळशिरस , द्वितीय विभागातुन : १) माधुरी ताई उदावंत पुणे , उत्तर महाराष्ट्र अधिकारी २) दिपा राऊत अकलूज ,३) आशा खराडे माळशिरस, तृतीय विभागातून १)  सौ.दिपाली म़ोहीते . पंढरपूर, २) सौ.वर्षा पाठक  श्रीपुर,३)सौ.मुगधा पोतदार.अकलुज, उत्तेजनार्थ विभागातून :१) सौ.सरला ताई लोखंडे वाकी औरंगाबाद, २)सौ. रुपाली ताई कुराडे . मुंबई, ३)सौ.धनश्री उदावंत.भुसावळ, ४) सौ.पलक गांधी.अकलुज,५)सौ.इंद्रायणी राऊत.अकलुज ,या स्पर्धकांनी या राज्यस्तरीय आँनलाईन उखाणे स्पर्धेत महीलांनी आपली बाजी मारली.

अध्यक्ष माननीय श्री विजय कुराडे, जी.एम.भागवतसर जनसंपर्क अधिकारी महाराष्ट्र, इंदुताई यादव महीला अध्यक्ष महाराष्ट्र, डॉ.शुभांगी रत्नपारखी.महीला जनसंपर्क अधिकारी सोलापूर जिल्हा या मान्यवरांच्या सहकार्याने उखाणे स्पर्धा घेण्यात आली.परीक्षक म्हणून अकाताई माने, वनिता कोरटकर , हेमलता मुळीक,प्रिया नागणे, यांनी उखाणे स्पर्धेचा निकाल जाहीर केला ह्या स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ लवकरच एका मोठा कार्यक्रम घेण्यात येणार आहे.असे संयोजकांकडुन कळविण्यात आले.
close