shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

केज तालुक्यातील सर्व नद्यांना पूर : पिके पाण्यात गेली..!!




आरणगाव जवळील फुल खचल्यामुळे आरणगाव ते काळेगाव संपर्क तुटला..!! 


------------------------------------------------------
 प्रकाश मुंडे | बीड जिल्हा प्रतिनिधी:-
केज तालुक्यात रात्री व रविवारी दुपारी झालेल्या दमदार पावसाने तालुक्यातील सर्व नद्यांना पूर आले असून शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तसेच मस्साजोग जवळील आरणगाव येथील बोभाटी नदीवरचा पूल खचल्यामुळे काळेगाव ते आरणगाव या दोन गावा दरम्यानचा संपर्क तुटला आहे.


 
या बाबतची माहिती अशी की, केज तालुक्यात शनिवार रात्री आणि रविवार या दोन दिवसात संततधार पाऊस सुरू आहे. या दमदार पावसामुळे केज तालुक्यातील बोभाटी, केजडी, होळना, मांजरा या नद्यांना पूर आलेले असून शेतातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. येळंब घाट, सारणी-सांगवी, मसाजोग, कोरेगाव, हादगाव डोका, शेलगाव-गांजी, युसुफ वडगाव येथून वाहणाऱ्या नद्यांना पूर आलेले आहेत. शेतात ही मोठ्या प्रमाणावर पाणी साचलेले असल्याने कापणी करून ठेवलेले सोयाबीन तसेच उभ्या पिकात पाणी साठल्याने पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेले आहे. मांजरा प्रकल्प, सारणी-सांगवी साठवण तलाव, जाधव जवळा येथील साठवण तलाव व सर्व मध्यम व लघु प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरले आहेत. दरम्यान आरणगाव येथील पूल खचल्यामुळे आरणगाव ते काळेगाव दरम्यानचा संपर्क तुटला आहे. माहिती मिळताच तहसीलदार दुलाजी मेंडके, नायब तहसीलदार लक्ष्मण धस यांनी आरणगाव येथे जाऊन पहाणी केली.

तसेच जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष बजरंग सोनवणे, भाजपचे युवा नेते अक्षय मुंदडा यांनीही नुकसानग्रस्त भागांना भेटी दिल्या आहेत.
close