shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

नदी काठी राहणाऱ्या नागरिकांनी सतर्क रहावे..-- सपोनि शंकर वाघमोडे..!!



------------------------------------------------------
प्रकाश मुंडे | बीड जिल्हा प्रतिनिधी:-
केज हद्दीतील नदीकाठच्या गावातील नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केज पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर वाघमोडे यांनी केले आहे.


पोलीस ठाणे केज हद्दीतीळ बीड व उस्मानाबाद जिल्हा सिमे लगत मांजरा नदी वहाते. ती नांदूरघाट दुरक्षेत्र व चिंचोली माळी बिट मधील पिट्टीघाट, राजेगाव, बोरगाव, भोपला, लाखा या गावा जवळून जाते. सदर गावांमध्ये व नदीमध्ये अंदाजे ५०० मिटर ते १००० मिटर पर्यंतचे अंतर आहे.
     
त्याच बरोबर चिंचोली माळी बिटमध्ये बोभाटी नदी वाहते आहे. तीच्या लगत केळगाव, बेळगाव, आरणगाव, काळेगाव, पिंप्री, वरपगाव, हदगाव या गावापासून अंदाजे ५०० मिटर ते १००० मिटर अंतरावरुन जाऊन मांजरा नदीला मिळते.

     
तसेच केज येथून वाहणाऱ्या केजडी नदी देखील वाहते या नदी लगत केज बोबडेवाडी, शेलगाव गांजी, मोटेगाव, गोटेगाव ही गावे आहेत. दोन दिवसां पासून परिसरात पडत असलेल्या पावसाने नदीच्या पाणी पातळीत वाढ होत आहे त्यामुळे नदीकाठच्या नागरिकांनी सतर्कता बाळगावी, मनुष्य प्राणी तसेच पशुधन आणि कापणी करून ठेवलेले  पिके सुरक्षित ठिकाणी ठेवण्याचे आवाहन सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर वाघमोडे यांनी केली असून संकट समयी सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष मिसळे, पोलीस उपनिरीक्षक दादासाहेब सिद्धे, अमोल गायकवाड, गवळी, बडे शेप, शेख यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे. तसेच प्रतिष्ठीत नागरिक, पत्रकार, पोलीस पाटील व ग्रामरक्षक दल यांनाही नागरिकांना सतर्क राहण्याचा ईशारा द्यावा असे कळविले असून अत्यावश्यक कामा शिवाय घरा बाहेर पडू नये असे आवाहन केले आहे.
close