प्रतिनिधी । मोहन शेगर :
सोनई - नेवासा तालुक्यातील गणेशवाडी येथे अंगणवाड्यांना मिळणारा पोषण आहार हा अतिशय निकृष्ट दर्जाचा मिळतो .या मध्ये मिळणारे मुग दाळ ,गहू ,मिरची पावडर ,मिठ ,हरभरा अशा प्रकारे शासनाच्या नियमानुसार सुका शालेय पोषण आहार सर्वच अंगणवाड्यांना देण्यात येतो .
पुणे जिल्ह्यातील एका कंपनीला याचा ठेका दिलेला आहे. माल आल्यानंतर त्याची कुठल्याही प्रकारे कुठेही त्याची तपासणी केली जात नसल्याने संबंधित ठेकेदाराचे व संबंधित अधिकारी यांचे फावते. मुगदाळीमध्ये माती मिश्रीत खडे ,किड लागलेली दाळ ,मिठामध्ये ही माती मिश्रीत खडे ,हरभरा किड लागलेला ,मिरची पावडर मध्ये देखील मातीचे कण ,गहु तर रेशनवर मिळणाऱ्या गव्हापेक्षाही खालच्या दर्जाचा अशा प्रकारे अधिकारी यांना ठेदाराकडून कमिशन मिळते म्हणून निकृष्ट आहार पुरविण्यात येतो. असे आढळून आले असताना ही त्याची अद्याप एकाही अधिकाऱ्याने देखील दखल घेतलेली नाही हे विशेष..! .तीन वर्षांच्या आतील मुलांना मिळणारा मुग दाळ ,हरभरा ,साखर ,मिठ ,मिरची पावडर असाााा हा आहार आहे.
त्यामध्ये गहु तीन वर्षाच्या मुलांना कसा खाऊ घालायचाअसा प्रश्न पालक करतात."मुल ही देवा घरची फुल " असे म्हटले जातेे. परंतु या माध्यमातुन एक प्रकारे त्याच्या जिवाशी हे अधिकारी कशा प्रकारे खेळ खेळतात त्याचे हे एक जिवंत उदाहरण आहे. अंगणवाड्यांना माल वितरित करण्यापूर्वी त्या मालाची प्रत्येक तालुका स्तरावर त्याची तपासणी करणे गरजेचे असताना त्याचे कडे जाणीवपूर्वक ठेकेदारांकडून कमिशन मिळते म्हणून डोळेझाक करण्यात येत असल्याचे या सर्व घडलेल्या गोष्टीवरून दिसून येत आहे.
असा पोषण आहार जर कायम मिळत राहीला तर मुल कशी सुद्रुड बनतील...? अजुनच साथीच्या आजारांना खत पाणी मिळेल अशी चर्चा सध्या ग्रामस्थांमधुन होत आहे. तरी संबंधित ठेकेदार व अधिकारी यांचेवर कठोरात कठोर कार्यवाही करण्यात यावी व यापुढे मिळणारा आहार हा उत्तम दर्जाचा मिळावा अशी प्रखर मागणी ग्रामस्थांनी केली आहे .
यापुढे मालाची तपासणी करुनच तो माल अंगणवाड्यांना वितरित करण्यात येईल .
सोपान ढाकणे
तालुका बालविकास प्रकल्प अधिकारी .

