shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

ग्रामस्थांनो सावधान..! "डासअळ्या"आहेत खऱ्या दुश्मन...!

अमरावती:- सद्या पावसाळा ऋतू चालू असल्या कारणाने अनेक गावात घरांच्या पत्र्यावर टाकावू वस्तू,टायर,फुटक्या भरण्या,इतर फुटकी भांडी या मध्ये पावसाचे पाणी साचलेले असते.या सोबतच घराच्या प्रांगणात अनेक मडके / रांजन असतात ज्या मध्ये सडा / सारून साठी पाणी साठवलेले असते,आणि या साठवलेल्या पाण्यात चामडोक झाले तरी हे पाणी ग्रामस्थ सहजासहजी फेकून देऊन भांडे रिकामे करत नाहीत.


अनेक अडचणी सांगून महिला ते पाणी फेकून न देता पाणी वाचवण्याचा प्रयत्न करतात. अशा परिस्थिती मध्ये त्या ग्रामस्थांना / महिलांना जर योग्य प्रकारे डेंगू / मलेरिया आजाराबाबत मार्गदर्शन करतांना डास कसा तयार होतो? डासअळी / चामडोक काय आहे? ते कसे तयार होतात? त्यापासून आपल्याला होणारा भयंकर धोका या बाबत आपुलकीने योग्य मार्गदर्शन करून आरोग्य शिक्षण दिले तर ग्रामस्थ / महिला हे दूषित पाणी फेकूनच काय तर दूषित पाणी आणि सरासरी अनावश्यक असणारी मडके / रांजन स्वतःच्या हाताने फोडतात.फक्त त्यांना आपुलकीने सांगणे गरजेचे आहे की या डासअळ्या / चामडोक तुमचे किती मोठे दुश्मन आहेत.

याच ( लार्वा ) डासअळी / चामडोक ची प्रतिमा एकदा का खेड्यातील ग्रामस्थांच्या नजरेत दुश्मन म्हूणन तयार झाली की प्रत्येक जण या चामडोक / डासअळीरुपी दुश्मणाला आपल्या घरात थारा देणार नाहीत. 

दिसेल तेथे चामडोक नष्ट करायचा प्रयत्न ग्रामस्थ करतील अशा वेळी ग्रामीण भागातून कीटकजन्य आराजाला आळा बसण्यास नक्की मदत होईल.
       श्री.आर.टी.आटोळे.
  बहुउ्देशीय आरोग्य कर्मचारी
              वऱ्हा
close