हर्षवर्धन पाटील यांची शेळगावला भेट ; आपत्तीग्रस्त दुकानदारांशी साधला संवाद
फोटो:- माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी शेळगावला भेट देऊन आपत्तीग्रस्त दुकानदारांशी साधला संवाद.
इंदापूर: प्रतिनिधी (दि.२ सप्टेंबर २०२१)
माजी मंत्री व भाजप नेते यांनी शेळगावला भेट देऊन आपत्तीग्रस्त दुकानदारांशी गुरुवारी ( दि.२) संवाद साधला. शेळगाव मधील सात दुकानांची मंगळवारी एकाच वेळी चोरी झाली. या दुकानदारांना हर्षवर्धन पाटील यांनी भेटून धीर दिला.
सध्या व्यापारी वर्ग आर्थिक संकटात सापडलेला असताना एकाच वेळी सात दुकानांमध्ये चोरी झाल्याने व्यापाऱ्यांमध्ये संताप निर्माण झाला आहे. हर्षवर्धन पाटील यांनी भेटी प्रसंगी दुकानदार व ग्रामस्थ यांचेशी चर्चा केली. यावेळी बारामतीचे उपविभागीय पोलीस अधिकारी नारायण शिरगांवकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक बी.एल. लातूरे यांचेशी संपर्क करून दुकानदारांच्या सुरक्षिततेसाठी उपाय योजना करावी, अशी सूचना केली. या भेटीच्या वेळी पदाधिकारी, कार्यकर्ते, ग्रामस्थ उपस्थित होते.
___________________________

