राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांचे माध्यमातून सणसर-लासुर्णे जि.प. गटासाठी जिल्हा नियोजन समिती मधून ८ कोटी रु. निधी मंजूर- जिल्हा नियोजन समिती सदस्य-सचिन सपकळ.
इंदापूर प्रतिनिधी: (२ सप्टेंबर २०२१)ना. दत्तात्रय भरणे यांचे प्रयत्नातून , उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, खासदार सुप्रियाताई सुळे यांचे मार्गदर्शनाखाली सणसर-लासूर्णे जि.प.गटासाठी ८ कोटी रु.निधी विकास कामांकरिता मंजूर झाल्याची माहिती जिल्हा नियोजन समिती सदस्य सचिन सपकळ यांनी दिली. गावामधील अंतर्गत रस्ते,बंदिस्त गटर ,ग्रा.प.विस्तारीकरण,ग्रा.प.नविन इमारत बांधणे,स्मशानभूमी सुधारणा करणे,चौक सुशोभिकरण करणे, वॉल कंम्पाउंड बांधकाम करणे,प्रकाश व्यवस्था (हायमास्ट दिवे)करणे ही कामे जनसुविधा नागरी सुविधा मधून मंजूर झाली आहेत तर गावाला जोडणारे मुख्य रस्ते ३०५४/५०५४ अंतर्गत मंजूर झालेले आहेत.
जन सुविधा व नागरी सुविधा मधून मंजूर झालेली रक्कम व गावे पुढील प्रमाणे:सपकळवाडी- ६९ रु.लक्ष, बेलवाडी- ५९ रु.लक्ष, लासुर्णे- ७८ रु. लक्ष,
सणसर - १३३ रु. लक्ष, कुरवली- २५ रु. लक्ष, पवारवाडी- ९रु. लक्ष, थोरातवाडी- २१ रु. लक्ष,
मानकरवाडी- १५ रु. लक्ष,
उध्दट- ३० रु. लक्ष , चिखली- ३१ रु. लक्ष, जाचकवस्ती- ४० रु. लक्ष, जांब- ३२ रु. लक्ष,
तावशी - ५ रु. लक्ष
३०५४ मधून मुख्य रस्त्यांसाठी मंजूर रक्कम व रस्ते
इ.जि.मा.२०२ ते इ.जि.मा.१९५ ला मिळणारा सपकळवाडी रस्ता (ग्रा.मा.२७१) - १५ रु. लक्ष,
ग्रा.मा.२४ चव्हाणवाडी ते इ.जि.मा.१९७ रस्ता ग्रा.मा.१०३ - ५० रु.लक्ष,
रा.मा.१२१ ते रणवरे मळा मार्ग थोरातवाडी (ग्रा.मा.२२४) - १५ रु. लक्ष ,
थोरातवाडी ते कावळे मळा रस्ता ग्रा.मा.३६४ - १५ रु.लक्ष,
कुरवली मेसाई मंदीर कडे जाणारा रस्ता ग्रा.मा.१२४ - ४० रु. लक्ष ,
रामा १२१ ते भोईटेमळा ग्रामा १२३ - २० रु. लक्ष,
५०५४ मधून मुख्य रस्त्यांसाठी मंजूर रक्कम व रस्ते-
रा. मा. १२१(भवानीनगर) ते तावशी रस्ता (इ.जि.मा.२०२) - ७५ रु.लक्ष ,
सणसर सपकळवाडी तावशी रस्ता इ.जि.मा.१९५ - १५ रु.लक्ष,
दत्तात्रय भरणे हे मंत्री मंडळात मंत्री म्हणून दाखल झाल्यानंतर त्यांनी इंदापूर तालुक्यात विकास कामांवर अधिकचा भर दिला आहे.करोडो रुपयाचा निधी तालुक्यातील विकास कामांसाठी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या माध्यमातून मिळाला असून तालुक्यात विविध ठिकाणची विकासकामे प्रगतीपथावर आहेत. राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या रुपाने तालुक्याला विकसनशील नेतृत्व लाभले असून त्यांच्या हातून तालुक्याचा कायापालट झाल्याशिवाय राहणार नाही अशी प्रतिक्रिया जिल्हा नियोजन समिती सदस्य सचिन सपकळ यांनी यांनी व्यक्त केली आहे.

