shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

दोन वर्षांपूर्वी दिलेले मोबाईल नादुरुस्त होत असल्याने अंगणवाडी सेविकांनी केले मोबाईल वापसी आंदोलन

दोन वर्षांपूर्वी दिलेले मोबाईल नादुरुस्त होत असल्याने अंगणवाडी सेविकांनी केले मोबाईल वापसी आंदोलन .

इंदापूर प्रतिनिधी:(२ सप्टेंबर २०२१) दोन वर्षांपूर्वी पोषण अभियान कार्यक्रमांतर्गत दिलेले मोबाईल नादुरुस्त होत असल्याने माहिती भरण्यात येणाऱ्या अडथळ्यांचा विचार करिता इंदापूर तालुका अंगणवाडी कर्मचारी संघटनेच्या वतीने मोबाईल वापसी आंदोलन करण्यात आले.
यावेळी इंदापूर तालुका संघटनेच्या अध्यक्षा बकुळाताई शेंडे व तालुक्यातील अंगणवाडी सेविका यावेळी उपस्थित होत्या.

 इंदापूर तालुक्यात ४११ अंगणवाडी सेविका असून अशा मोबाइलमुळे दैनंदिन नावे, हजेरी, वजन, उंची, स्तनदा व गर्भवती मातांची माहिती, पोषण आहाराचे वाटप इत्यादी सविस्तर माहिती या मोबाईल द्वारे भरण्यात येत असते. तसेच शासनाने वेळोवेळी नवीन प्रणाली तयार करून दिलेले ॲप या मोबाईल मध्ये घेण्यासाठी व ती माहिती कळविण्यासाठी या मोबाईलचा वापर करणे व होणे शक्य होत नसल्याने इंदापूर तालुक्यातील पंचायत समितीच्या आवारात अंगणवाडी सेविकांनी मोबाईल परत करण्याचा पवित्रा घेतला या वेळी सदर मोबाईल प्रकल्प अधिकारी संदीप काळे यांच्याकडे सुपुर्त करण्यासाठी गेले असता त्यांनी सदर मोबाईल घेण्यास कोणाचीही परवानगी अथवा आदेश नसल्याने हे मोबाईल घेऊ शकत नाही असे सांगितल्याने सदर अंगणवाडी सेविका यांनी प्रकल्पाधिकारी यांच्यासमोर मोबाईल  ठेवून दिले. या आंदोलनावेळी अंगणवाडी सेविकांनी एक रुपयाचा कडीपत्ता मोबाईल देणारा बेपत्ता या घोषणा देत परिसर त्यांच्या आवाजाने घुमून गेला.

यावेळी इंदापूर तालुका अंगणवाडी सेविका कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष बकुळाताई झेंडे म्हणाला की,
पोषण अभियान कार्यक्रमांतर्गत सन २०१९ मध्ये राज्यातील १०५५९२  अंगणवाडी सेविकांना शासकीय कामासाठी मोबाईल वाटप करण्यात आले होते. या मोबाईलची वॉरंटी चा कालावधी दोन वर्ष होता. तो कालावधी २०२१ मधील मे महिन्यामध्ये संपला असून सदर मोबाईल मध्ये माहितीही जास्त प्रमाणात भरावयाचे असल्याने हा मोबाईल वापरणे त्रासदायक ठरत असल्याने राज्यातील अंगणवाडी सेविका आक्रमक झाले असताना आज (दि.२) सप्टेंबर रोजी मोबाईल परत करण्यासाठी राज्यस्तरीय आंदोलन करण्यात येत असल्याने इंदापूर तालुक्यातील अंगणवाडी   सेविकांनी इंदापूर पंचायत समिती आवारात मोबाईल वापसी आंदोलन केले.
close