गुरुवारी दुपारी केज मध्ये आवळल्या मुसक्या..!!
प्रकाश मुंडे | बीड जिल्हा प्रतिनिधी:-
अंबाजोगाई तालुक्यातील सेलूअंबा पेट्रोल पंपावर दरोडा टाकणाऱ्या व 6 वर्ष फरार असलेला आरोपीला बुधवारी मोठया सिताफीने बीड च्या एल.सी.बी. ने पकडले . सायंकाळी शहर पोलिसांच्या ताब्यात दिल्यानंतर संबंधीत आरोपी हा लघुशंखेचे कारण सांगून ठाण्यातून पोबारा करून पळून गेला. मागील पाच वर्षापासून पोलिसांना हवा असलेला हा आरोपी ठाण्यातूनच पळून गेल्या मुळे पोलिसांचा वचक कमी झाला असल्याचे यावरुन दिसून येते.
केज तालुक्यातील जवळबन येथील समाधान वैरागे याने सन 2016 मध्ये अंबाजोगाई शहर पोलिस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या सेलूअंबा येथील माजी जि.प.कृषी सभापती राजेभाऊ औताडे यांच्या पेट्रोल पंपावर टाकलेल्या दरोडयात त्याचा सहभाग होता. तेव्हा पासून तो फरार होता. बीड च्या स्थानिक गुन्हा शाखेचे प्रभारी पोलिस निरिक्षक सतिश वाघ यांनी उपनिरिक्षक संतोष जोंधळे यांचे पथक त्याच्या माघावर पाठवले या पथकाने बुधवारी दिवसभर समाधान वैरागे याच्या पाळत ठेवून त्याच्या मुसक्या आवळल्या दरम्यान वैद्यकीय तपासणी करुन त्यास अंबाजोगाई शहर पोलिसाच्या ताब्यात दिले.
शहर पोलिस ठाण्याच्या ठाणे अमलदाराच्या बसलेल्या खुर्ची समाधान वैरागे यांनी पी.एस.ओ. व इतर पोलिस कामात व्यस्त असल्याची संधी साधत रात्री 8.30 वाजता ठाण्यातून पोबारा केला. तो पळून गेल्यामुळे ठाण्यामध्ये एकच गोंधळ उडाला त्याच्या शोधासाठी शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरिक्षक बाळासाहेब पवार यानी पथक नियुक्त त्याच्या माघावर पाठवले आज दुपारी वैरागे हा केज येथून पुण्याला जाणार असल्याची माहिती मिळाल्या नंतर शहर ठाण्याच्या स्थानिक गुन्हे शाखे नरहरी नागरगोजे, कांदे व घोळवे यांनी मोठया सिताफीने केज येथून त्याला पकडले. दरोडयातील आरोपीने पलायन केले म्हणून त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया बातमी लिही पर्यंत सुरु होती.

