shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

आईच्या मानेवर विळा मारणाऱ्या मुलाची आत्महत्या नव्हे खुनच..!!

भावानेच केली चिडून भावाची हत्या...

वडिलाच्या फिर्यादीवरून मुलाविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल..!! 

दारूच्या नशेत घडला सर्व थरार...
                                                  
प्रकाश मुंडे | बीड जिल्हा प्रतिनिधी :-
 आईच्या मानेवर वीळा मारून खून करण्याचा प्रयत्न करणा-या तालुक्यातील मालीपारगावच्या त्या घटनेने जिल्ह्यात दि ०१ सप्टेंबर बुधवार रोजी खळबळ उडवून दिली होती.मन सुन्न करणाऱ्या या घटनेत हल्लेखोर मुलाने फाशी घेतल्याचा प्रकारही समोर आला.परंतु त्या मुलाची आत्महत्या नसून त्याचा खूनच त्याच्या सख्ख्या भावाने चिडून जागेवरच केला असल्याचा प्रकार समोर आला.बुधवारचा हा सर्व थरार घटनाक्रम दारूच्या तर्र नशेत असणाऱ्या कुटुंबातील कर्त्या पुरुषात घडला. दरम्यान वडीलाच्या फिर्यादीवरून मुला विरुद्ध खुनाचा गुन्हा माजलगाव ग्रामीण पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे.

  
दि ०१ सप्टेंबर बुधवार रोजी सकाळी ११;३० वाजण्याच्या सुमारास मालीपारगाव येथे शेतात असणाऱ्या घरात आई पारूबाई कदम यांच्या मानेवर वीळा मारून त्यांना गंभीर जखमी त्यांचा मुलगा बापू उर्फ बालासाहेब मच्छिद्र कदम यांने केले होते.यावेळी तो दारूच्या नशेत होता.यावेळी दुसरा मुलगा गणेश मच्छिंद्र कदम हाही दारू पिलेल्या अवस्थेत तेथेच होता.आईला मारून गंभीर जखमी केल्याने गणेशचा रागाचा पारा चढला.व त्याने लागलीच बापू उर्फ बालासाहेबच्या पाठीमागुन नरड्याला हाताने जोराने जीव जाईपर्यंत दाबले.व त्याचा खून केला.

हा सर्व प्रकार घडल्यानंतर जखमी पारूबाई यांना उपचारार्थ बीडला हलवण्यात आले होते.व बालासाहेब उर्फ बापू कदम याने आत्महत्या केल्याचा बनाव काही काळ या ठिकाणी करण्यात आला.परंतु परिसरात कुजबूज खून झाल्याची ऐकायला मिळत होती.पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन सखोल चौकशी करून बालासाहेब उर्फ बापूची आत्महत्या नव्हे तर त्याचा खून झाला असल्याचा प्रकार उघड केला . यावेळी यातील आरोपी मयताचा सख्का भाऊ गणेश कदम असल्याने त्याला दि ०१ सप्टेंबर बुधवार रोजी दुपारनंतर पोलिसांनी ताब्यात घेतले.

दरम्यान वडील मच्छिंद्र अंबादास कदम यांनी आपला मोठा मुलगा बालासाहेब कदम याच्या खुनाचा गुन्हा लहान मुलगा गणेश कदम यांने केला असल्याची फिर्याद माजलगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात दिली आहे.गणेश कदम विरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.प्रकरणाचा पुढील तपास साहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश ईधाटे ,जमादार विठ्ठल राठोड हे करत आहेत. बुधवारी मालीपारगाव येथे दारूच्या नशेत घडलेल्या मन सुन्न करणाऱ्या थरारक घटना क्रमाने जिल्हा हादरला असुन कदम कुटुंबावर मात्र या घटनेने दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
close