भरत शहा यांनी कर्मयोगी कारखाना निवडणूक प्रक्रियेत आपला उमेदवारी अर्ज केला दाखल .
इंदापूर प्रतिनिधी: इंदापूर तालुक्यातील कर्मयोगी सहकारी साखर कारखान्याची निवडणूक प्रक्रियात दि. २२ सप्टेंबर पासून नामनिर्देशन अर्ज दाखल करण्यात येत असून आज दि. २४ सप्टेंबर२०२१ रोजी पर्यंत कर्मयोगी कारखान्याच्या २१ जागा वरती नामनिर्देशन अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस असताना माजी संचालक भरत शहा यांनी ऊस उत्पादक गट इंदापूर येथून अर्ज दाखल केला.
काही दिवसांपूर्वी आपल्या पदाचा काही कारणास्तव तडकाफडकी राजीनामा दिला होता.
भरत शहा यांनी शुक्रवारी (दि. २४ सप्टेंबर) रोजी दुपारी २.१५ वाजण्याच्या दरम्यान ऊस उत्पादक गट इंदापूर या गटातून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.
इंदापूरचे तहसीलदार व सहाय्यक निर्णय निवडणूक अधिकारी श्रीकांत पाटील, सहाय्यक निबंधक जिजाबा गावडे, नायब तहसीलदार अनिल ठोंबरे यांनी अर्ज स्वीकारला.
यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष ॲड.शरद जामदार, भाजपा इंदापूर शहराध्यक्ष शकील भाई सय्यद, ॲड. कृष्णाजी यादव, मुकुंद शहा, महेंद्र रेडके, माऊली चवरे, माजी सभापती बाळासाहेब पाटील, सुनील तळेकर व इतर मान्यवर उपस्थित होते.

