प्रतिनिधी : आसावरी वायकर
चिचोंडी पाटील : दि .२४ / चिचोंडी पाटील गावामध्ये ग्रामपंचायतच्या पुढाकारातून व ग्रामस्थांच्या सहकार्यातून वॉर्ड प्रमाणे लसीकरण मोहिम सुरू करण्यात आलेली असून पहिल्याच दिवशी वॉर्ड क्रमांक १ मध्ये २१४ ग्रामस्थांनी लस घेऊन या मोहिमेस उत्स्फूर्त प्रतिसाद दिला असल्याची माहिती भाजपा तालुकाध्यक्ष तथा चिचोंडी पाटील गावचे सरपंच मनोज कोकाटे यांनी दिले.
यावेळी बोलताना कोकाटे यांनी सांगितले की, संभाव्य कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या अनुषंगाने गावामध्ये जास्तीत जास्त ग्रामस्थांचे लसीकरण करून घेऊन तिसऱ्या लाटेला गावापासून दूर ठेवण्याचा ग्रामपंचायतचा मानस आहे. यासाठी ग्रामपंचायतच्या वतीने अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्या सहकार्याने गावामध्ये कोरोना लसीकरण सर्वेक्षण करण्यात आले. सदर सर्वेक्षणात जे ग्रामस्थ लसीकरणापासून वंचित आहेत अश्या ग्रामस्थांना ग्रामपंचायत सदस्यांच्या वतीने लसीकरणाचे महत्व पटवून देऊन त्यांच्या वॉर्डमध्येच लस देण्याचा ग्रामपंचायतचा हा छोटासा प्रयत्न असल्याचे प्रतिपादन यावेळी कोकाटे यांनी केले.
यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष तथा चिचोंडी पाटील गावचे सरपंच मनोज कोकाटे, उपसरपंच कल्पनाताई ठोंबरे, युवानेते प्रवीणजी कोकाटे, ग्रामपंचायत सदस्य अशोकजी कोकाटे, अर्चनाताई चौधरी, दिपकजी हजारे, महादजी कोकाटे, दत्तूमामा धुळे, माऊली ठोंबरे, वैभव कोकाटे, भाऊसाहेब बेल्हेकर यांच्यासह आदी ग्रामस्थ उपस्थित होते.
लसीकरण मोहीम यशस्वी होण्यासाठी ग्रामसेवक देविदास मोरे, वैद्यकीय अधिकारी डॉ.सांगळे मॅडम, आरोग्य सेविका फुंदे ताई, आरोग्य सेवक लिपणे सर, ग्रामपंचायत कर्मचारी राजेंद्र तनपुरे, अंगणवाडी सेविका द्रौपदीताई पांडुळे, आशाताई ठोंबरे, किरणताई खराडे, आशा सेविका सविताताई खराडे, छायाताई पवणे, मदतनीस इंगळे ताई यांच्यासह ऑपरेटर बालू बोरुडे, मयूर ठोंबरे, विशाल दहातोंडे, सनी गाडे व साई सेवा प्रतिष्ठाणचे विशेष सहकार्य लाभले.

