शेतीला जोड धंदा दुग्ध व्यवसाय करताना शेतकऱ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा करावा वापर - श्रीराज भरणे.
इंदापूर प्रतिनिधी: (२५ सप्टेंबर २०२१)शेतीला जोड धंदा म्हणून दुग्ध व्यवसाय करताना शेतकरी बांधवांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करावा असे प्रतिपादन सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांचे चिरंजीव श्रीराज दत्तात्रय भरणे यांनी डिकसळ येथे केले.
शुक्रवार( दि.२४ सप्टेंबर) रोजी मोतीलाल सुरडे यांच्या महावीर डेअरी आणि मिल्क प्रॉडक्ट या व्यवसायाच्या वाढीव प्रकल्पाच्या शुभारंभ श्रीराज भरणे यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी तर बोलत होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बारामती नगरपालिकेचे नगरसेवक जयसिंग देशमुख होते.तर प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते अजिंक्य माडगे होते.
श्रीराज भरणे म्हणाले,की सध्या युवक नोकरीच्या मागे लागुन ठराविक चौकटीत जीवन जगत असुन आपले भविष्य अडचणीत आणत आहे.जिद्द ,चिकाटी प्रामाणिकपणा व विश्वासहर्ता हे गुण आत्मसात करून व्यवसाय केल्यास निश्चित व्यवसायात प्रगती होते व नेत्रदीपक वैभव प्राप्त करता येते.
पुढे बोलताना त्यांनी सांगितले की युवकांनी नोकरीच्या मागे न लागता उच्च शिक्षण घेऊन व आधुनिक तंत्रज्ञान विकसित करून व्यवसाय करण्याचा प्रयत्न करावा.यावेळी त्यांनी प्रत्यक्ष गोठ्यात जाऊन गाईंच्या व्यवस्थापनाची व त्यांच्या जातीची माहिती घेतली.
यावेळी मोठ्या संख्येने दूध उत्पादक शेतकरी उपस्थित होते.सूत्रसंचालन अमोल धापटे यांनी तर प्रास्ताविक महावीर डेअरीचे मालक मोतीलाल सुरडे यांनी केले.

