प्रतिनिधी : शेख रफिक
पारनेर : दि . २५ / साहित्य , कला, क्रिडा व शिक्षण क्षेत्रात तसेच सामाजिक , राजकीय , धार्मिक क्षेत्रात महाराष्ट्रात अग्रगण्य असणारा पारनेर तालुका . या तालुक्याने आजवर राज्याला व देशाला अनेक मौल्यवान हिरे दिले आहेत . त्यापैकीच एक पारनेर तालुक्यातील दरोडी गावचे सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातून शिक्षण घेऊन मुंबईसारख्या ठिकाणी शिक्षकी व्यवसायाच्या माध्यमातून नोकरी करत असताना आपल्या बुद्धिमत्तेच्या व कष्टाच्या बळावर मुंबई महानगर पालिकेमध्ये शिक्षण निरीक्षक या पदापर्यंत पोहोचले तसेच शिक्षण निरीक्षक या पदाचा भार सक्षम पणे पेलणाऱ्या व आपल्या बुद्धी कौशल्याच्या जोरावर बृहन्मुंबई महानगरपालिकेत शिक्षण क्षेत्रात एक वेगळेपण निर्माण करत आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटविला .त्यामुळे बृहन्मुंबई महानगरपालिकेने त्यांना महानगरपालिकेत शिक्षण विभागात प्रशासकीय अधिकारी म्हणून रुजू केले . असे पारनेर तालुक्याचे भूमिपुत्र व दरोडी गावचे अभ्यासू व्यक्तिमत्व श्री.किसनराव पावडे पाटील यांचा तसेच वडझिरे गावातीलही अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत शिक्षण घेत डी. वाय.एस.पी. या पदापर्यंत पोहोचलेले नवनाथ ढवळे साहेब ज्यांना राष्ट्रपती शौर्य पुरस्कार मिळाल्याबद्दल नवी मुंबई येथे पारनेर नगर विधानसभा मतदार संघाचे राष्ट्रवादीचे आमदार निलेश लंके यांनी भेट घेऊन त्यांचा यथोचित सन्मान केला !
या सत्कार मूर्तींचा सत्कार करताना आमदार लंके यांनी तालुक्यातील भूमिपुत्रांचा सन्मान करताना असे म्हटले की या बुद्धिजीवी दोनही अधिकाऱ्यांना मिळालेली पदोन्नती हा केवळ पावडे साहेब व ढवळे साहेब यांचा हा गौरव नसुन पूर्ण पारनेर तालुक्याचा अभिमान आहे .आज असे बुद्धिवादी अधिकारी माझ्या मतदार संघातील आहेत याचा मला अभिमान आहे आपण आपल्या पदाचा उपयोग सर्वसामान्य जनतेसाठी गरजू निराधार अपंगांसाठी करावा अशीही आमदार लंके यांनी या दोनही अधिकाऱ्यांना सुचित केले.व त्यांचा यथोचित सन्मान केला .
पारनेर तालुक्यात यापुढील काळातही अनेक आय.ए.एस . आय.पी.एस . अधिकारी तयार व्हावेत असा माझा माणस आहे व त्यासाठी मी काहीही करायला तयार आहे असे हि यावेळी आमदार लंके यांनी सांगितले.
यावेळी या सत्कार सोहळ्यास आहेर सर,महेश उकांडे सर,पंकज शेळके,योगेश धानके सर,सतीश रोकडे सर,तसेच कल्याण मधील व्यवसकीय दत्ता गवळी शेठ व विष्णू शेठ सांगळे आदी मान्यवर उपस्थित होते. आतिशय दिलखुलास व्यक्तीला भेटण्याचा योग आला असे बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभागाचे नवनिर्वाचित प्रशासकीय अधिकारी किसनराव पावडे सरांनी आमदार लंके यांचे विषयी आम्हाला तुमचा सार्थ अभिमान आहे या शब्दाने कृतज्ञता व्यक्त केली !

