शिर्डी एक्स्प्रेस लाईव्ह वृत्तसेवा प्रतिनिधी दिपक हरिश्चंद्रे.
अहमदनगर,दि.२२ सप्टेंबर,(प्रतिनिधी) – महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने घेण्यात येणाऱ्या शिक्षक पात्रता परीक्षेसाठी (Teacher Eligibility Test) यापूर्वी 10 ऑक्टोबर रोजी घेण्यात येणार होती. त्यात बदल करून सदर परीक्षा आता दिनांक ३१ ऑक्टोबरला घेण्याचा आदेश परीक्षा परिषदेचे आयुक्त तुकाराम सुपे यांनी दिले आहेत.
पात्रता परीक्षेसाठी प्रवेशपत्र ऑनलाईन उपलब्ध करून देण्यात येणार आहे. ते प्रवेश पत्र नव्या नियोजनानुसार १४ ऑक्टोबर ते ३१ ऑक्टोबर या कालावधीत उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.
याच बरोबर शिक्षक पात्रता परीक्षा पेपर प्रथम हा ३१ ऑक्टोबरला सकाळी साडेदहा ते दुपारी एक या वेळेत होणार असून, पात्रता परीक्षेचा व्दितीय पेपर हा दुपारी दोन ते साडेचार या वेळेत निर्धारित करण्यात आला आहे.
राज्यात शिक्षक भरतीसाठी आवश्यक असणाऱ्या शिक्षक पात्रता परीक्षा गेली दोन वर्ष होऊ शकलेल्या नव्हत्या. यावर्षी कोरोना परिस्थितीनंतर राज्य सरकारने परीक्षा घेण्याचे निश्चित केले होते. त्यासाठी शासनाने १० ऑक्टोबर तारीख निश्चित केली होती. मात्र राज्यात या परीक्षेच्या कालावधीच्या दरम्यान केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत लेखी परीक्षेचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये ही बाब लक्षात घेऊन परीक्षेच्या तारखा पुढे ढकलण्यात आलेल्या आहेत.
Shirdi Express Live#करीता बातम्या🗞️ आणि जाहिराती साठी संपर्क @दिपक हरिश्चंद्रे( प्रतिनिधी )📲7350591600.

