shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

राहुरी तालुक्यातील गुहा येथील एका महिलेने भूमिअभिलेख कार्यालयासमोरच विषारी औषद प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न..!!


शिर्डी एक्स्प्रेस लाईव्ह वृत्तसेवा राहुरी तालुका प्रतिनिधी दिपक हरिश्चंद्रे.

राहुरी:  तालुक्यातील गुहा येथील एका ३० वर्षिय तरूणीने भुमिअभिलेख कार्यालयाच्या प्रवेशद्वारात विषारी औषध घेवून आत्महत्येचा प्रयत्न केल्याने खळबळ उडाली आहे.
        याबाबत समजलेली माहिती अशी की, सोमवारी दुपारी 12 वाजता अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यातील गुहा येथील 30 वर्षीय तरुणी ही राहुरी येथील भुमिअभिलेख कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर उभी असताना सोबत आणलेली विषारी औषधाची बाटली

काढून सेवन करुन आत्महत्येचा प्रयत्न केला. त्या तरुणीस तातडीने राहुरी फँक्टरी येथील विवेकानंद नर्सिंग होम मध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले असून तिच्यावर उपचार सुरु आहेत.
         विवेकानंद नर्सिंग होमच्या वैद्यकीय सुञांनी विषारी औषध सेवन केल्याची माहिती राहुरी पोलीस ठाण्यात कळविली आहे. सायंकाळ पर्यंत पोलीस ठाण्यात कुठल्याही गुन्ह्याची नोंद झालेली नव्हती.नेमकी कोणत्या कारणावरून तरुणीने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला हे मात्र समजू शकले नाही.
Shirdi Express Live#करीता बातम्या🗞️ आणि जाहिराती साठी संपर्क @दिपक हरिश्चंद्रे , खडांबे (राहुरी- तालुका प्रतिनिधी )📲7350591600

close