उपोषण सुरूच. आंदोलन तीव्र करण्याचा निर्धार.
प्रतिनिधी स्नेहा उत्तम मडावी
इन्क्रेडिबल समाज सेवक ग्रुपचे संस्थापक आणि जनआंदोलनांच्या राष्ट्रीय समन्वयाचे कार्यकर्ते अस्लमभाई बागवान हे 21 सप्टेंबर पासून बेमुदत उपोषणाला बसले आहेत. नागरिकांचा क्षेत्रसभेचा आणि लोकप्रतिनिधींच्या कामावर निगराणी ठेवण्याचा अधिकार अबाधित रहावा या मागणीसाठी त्यांचे उपोषण मागील सात दिवस चालू आहे. अखेर आज प्रशासनाने त्याची दखल घेतली व उपायुक्त श्री देशमुख यांनी कार्यालयात बोलावून असलम भाईंशी बोलणे केले. त्यांचे सर्व मुद्दे मान्य आहेत आणि तसे पत्र आपण त्यांना देऊ असे त्यांना आश्वासन दिले.
त्यावेळी इब्राहिम भाई आणि अन्य साथीही उपस्थित होते. हे आश्वासन लेखी मिळावे असा आग्रह कार्यकर्त्यांनी धरला. मात्र आज दिवसअखेर जे पत्र मिळाले ते अत्यंत थातूरमातूर व केवळ उपेक्षाच नव्हे तर फसवणूक करणारे होते.
त्यामुळे अर्थातच उपोषण मागे घेण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, उलट आंदोलन तीव्र करण्याचा निर्णय अस्लम भाईनी घेतला आहे व त्याला आमचा पाठिंबा आहे.
उद्या दुपारी साडेबारा वाजता या आणि तुम्हाला हवे तसे पत्र देऊ असे आज संध्याकाळी उशीरा प्रशासनाकडून सांगण्यात आले. अर्थात त्यावर विश्वास ठेवण्यासारखी परिस्थिती नाही. त्यामुळेच सर्व समविचारी संघटना आणि समर्थक व्यक्तींना आवाहन आहे की *उद्या, 28 सप्टेंबरला सकाळी 11 वाजता उपोषणस्थळी म्हणजे पुणे कार्पोरेशनच्या मुख्य गेटजवळ जास्तीत जास्त संख्येने यावे, आंदोलनाला पाठिंबा द्यावा आणि प्रशासनाशी चर्चा करून योग्य तो निर्णय मिळवण्यात सहकार्य करावे.
आज दुपारी तिथे उपस्थित सर्व समर्थक संघटना आणि व्यक्ती यांच्या वतीने एक पत्र आम्ही प्रशासनाला दिले आहे ते तुमच्या माहितीसाठी यासोबत जोडत आहोत. कृपया त्यातील मुद्दे पहावेत जे पुढील चर्चेसाठी उपयुक्त ठरतील.
सहकार्याच्या अपेक्षेत,सुनीती सु र, सुहास कोल्हेकर, इब्राहीम खान व साथीजनआंदोलनांचा राष्ट्रीय समन्वय

