गुरू लावी वाट। गुरु दावी वाट
गुरु पायवाट, सोय करी ।।१।।
गुरुसी गाढ वाचे, देऊनिया रूप
साठवावे मनांत, चंदू म्हणे।।२।।
गुरु सांगे जना, गुरु सांगे मना।
बा एकाशी जाणा, सर्वकाळ ।।३।।
वाट लावूनिया, वाटितो दुर्गुणा
वाटितो कुकर्मा, दिनरात ।।४।।
दिनरात्र ध्यान, गुरूचे करावे।
मनी साठवावे, परब्रम्ह ।।५।।
मन सांगे जना, परब्रम्ह जाणा।
त्री गुणांचा पान्हा, परब्रह्म ।।६।।
रसाचा आहार, आणि उच्चार ।
करावा प्रचार, ब्रह्मरूपे।।७।।
ब्रह्म जाणोनिया, जाळितीजे चिंता।
विरक्तजी कांता, हृदयामाजी ।।८।।
विरक्तीचे गाव, आणिक हे नाव।
वृद्धा खटाटोप, साधकांचा ।।९।।
शोधकांनी फक्त, जावे गुरूपाशी ।
टाळावी आसक्ती, सद्गुरुरूपे ।।१०।।
चंद्रकांत शहासने, पुणे
मो. ९८८१३७३५८५

