शिर्डी प्रतिनिधी :
लोणी काळभोरच्या विद्यमान उपसरपंच ज्योती अमित काळभोर व लोणी काळभोर ए.पी.आय महानवर यांच्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण करण्यात आले. ग्रीन फाऊंडेशन महाराष्ट्र राज्यच्या वतीने पृथ्वीराज कपूर मेमोरियल हायस्कूल येथे लोणी काळभोर सरपंच राजाराम बापू काळभोर यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी सदस्या ललिताताई काळभोर, वनव्यवस्थापन समिती अध्यक्ष युवराज काळभोर, युवा नेते आमित काळभोर, ग्रीन फाऊंडेशन अध्यक्ष अमित जगताप, प्रशांत जगताप, अजय पठारे, विकी काळभोर, अमिर सय्यद, ओमकार जगताप, बापु काळभोर, तसेच लोणी काळभोर ग्रामस्थ, शिवशाही प्रतिष्ठान उपस्थित होते.


