निसर्गाचा रुद्रावतार : अखंडित अतिवृष्टीने अनेक गावे उद्ध्वस्त, कधीही भरून निघणार नाही असे प्रचंड नुकसान..!!
प्रकाश मुंडे | बीड जिल्हा प्रतिनिधी:-
२३ सप्टेंबर पासून सुरू झालेल्या मुसळधार पावसाने सोमवारपासून तर अधिकच धुमाकूळ घातला. अतिवृष्टीमुळे केज, अंबाजोगाई, बीड तालुक्यातील ओढे, नद्या क्षमतेबाहेर वाहत असून अनेक गावात पाणी शिरले आहे. बहुतांशी गावांचा संपर्क तुटला असून अनेक ठिकाणचे पूल पाण्याखाली गेल्यामुळे परिस्थिती अधिक बिकट झाली आहे. शेती आणि मालमत्तेच्या नुकसानीची तर गिणतीच राहिली नाही.
अखंडित पावसामुळे मांजरा धरणात पाण्याची आवक प्रचंड वाढल्याने मंगळवारी पहाटे धरणाचे सर्वच्या सर्व १८ दरवाजे उघडण्यात आले असून त्यातून नदीपात्रात पाण्याचा मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांनाही पुराचा धोका निर्माण झाला असून नागरिकांनी सतर्क राहण्याची आवश्यकता आहे. मांजरा प्रकल्पाचे सर्व दरवाजे उघडण्याची गेल्या अनेक दशकातील ही पहिलीच वेळ आहे.
केज तालुक्यात काल रात्री ढगफुटी झाली आहे. अनेक गावात पाणी शिकल्यामुळे प्रचंड नुकसान झाले आहे. अनेकांचे जनावरे, गाड्या पाण्यात वाहून गेल्या आहेत. केज ते अंबेजोगाई संपर्क पिसाटी नदीवरील अख्खा पुलच वाहुन गेल्या मुळे तुटला आहे. बनकरंजा, होळ, जवळबन, नायगाव, पिसेगाव, तांबवा,कानडीमाळी ,चिंचोली , साळेगाव,नाव्होली ,बोरगाव,हादगाव,ढोका व ह्या गावांनी कधीही भरून निघणार नाही असे नुकसान झाले आहे. केज तालुक्यातील सर्व पिके पाण्याखाली गेली आहेत. अनेक ठिकाणी ऊस पुर्णपणे आडवा झाला आहे.
केज शहरातून जाणाऱ्या रस्त्याचे काम Hpm कंपनीकडे आहे. Hpm कंपनीच्या अत्यंत ढिसाळ कारभारामुळे पिसाटी नदीवरील अख्खा पुल वाहुन गेला आहे. शहरातील रस्त्याचे काम संथ गतीने केले जात आहे त्यामुळे अनेक वेळा अपघात होत आहेत.

