शिवनेरी किल्यावरून दर वर्षी पर्यावरण व आरोग्य जनजागृतीसाठी शिवजन्मभुमी फाउंडेशन सायकलवारीचे आयोजन करीत आसते.या वर्षी या वारीचे पाचवे वर्षे आहे.त्या निमित्ताने भारत सरकारच्या भारतीय डाक विभागाच्या वतीने 5rs च्या रेव्हीनिव्ह स्टॅम्पवर शिवजन्मभुमी सायकलवारीचा लोगो प्रिंट करण्यात आला आसुन या तिकिटाचे *छत्रपती शिवाजी महाराजांचे कोल्हापुर गादीचे तेरावे वंशज,राज्यसभेचे खासदार छत्रपती संभाजीराजे भोसले यांचे हस्ते अनावरण करण्यात आले.
यावेळी शिवजन्मभुमी सायकलवारीची टीमचे धनंजय माताडे,सुनिल इचके,संकेत वाघ,नितीन कांबळे, सायकलोपिडायचे शंकर गाढवे व शरद पोखरकर उपस्थित होते.
भारतात सर्वात पहिल्यांदाच
हा सायकल प्रकारासाठी प्रिंट करण्यात आलेला लोगोचे 5rs चे पोस्ट तिकीट तयार करण्यास मुंबई पोस्ट ऑफीस पुर्व विभागाचे डाक साह्यक महेश शिंदे यांनी विशेष सहकार्य केले.
शिवजन्मभुमी व सर्व सायकलप्रेमींसाठी हा एक मानाचा तुरा शिरपेचात लागला आसल्याचे संभाजीराजे म्हणाले.
यावर्षीची शिवनेरी ते शिर्डी आरोग्य जनजागृती
सायकलवारीचे 20 नोव्हेबंर 2021 रोजी आयोजन केले आसुन यात महाराष्ट्रभरातुन तसेच कर्नाटक,केरळ येथील 200 सायकलस्वार सहभागी होणार आसल्याचे साईसेवक धनंजय माताडे यांनी सांगितले.

