विद्यानिकेतन प्रोफेशनल अकॅडमी ही आसपासच्या ६०ते ७०किलोमीटर परिसराला वरदान ठरणारी संस्था - हरिदास माने.
विद्यानिकेतन प्रोफेशनल अकॅडमी इंदापूर येथे शिक्षक व पालक यांचा शिक्षक दिनानिमित्त सत्कार संपन्न.
इंदापूर प्रतिनिधी:
(दि.७ सप्टेंबर २०२१)
विद्यानिकेतन प्रोफेशनल अकॅडमी इंदापूर येथे विद्यार्थ्यांनी आयोजित केलेल्या शिक्षक दिनानिमित्त शिक्षक व पालकांचा सत्कार समारंभ येथील विद्यार्थ्यांनी आयोजित केला होता यावेळी विद्यानिकेतन हे आसपासच्या ६०ते ७० किलोमीटरच्या परिसराला वरदान ठरणारी विद्यभ्यासाची संस्था आहे असे हरिदास माने यांनी प्रमुख पाहुणे या नात्याने विद्यार्थी व पालक यांना संबोधित करताना प्रतिपादन(दि.६) रोजी केले.
करण्यात आला. तसेच यावेळी उपस्थित मान्यवर यांना राष्ट्रपती अब्दुल कलाम यांच्या जीवन चरित्राचे पुस्तक मान्यवरांना भेट देऊन त्यांचा सन्मान केला.
यावेळी हरिदास माने, श्रीयश नलवडे, कर्चे सर, मंगेश डोंगरे,दादासाहेब जगताप,दादासाहेब काळे सौ.मीना काळे,प्रा. कुणाल काळे,धनाजी पाटील, शिक्षक धाईंजे सर, यमगर सर, लोंढे सर, ठोंबरे सर, काळे मॅडम.
इत्यादी मान्यवर व पालक वर्ग उपस्थितीत होते.
यावेळी हरिदास माने विद्यार्थ्यांना संबोधन करताना म्हणाले की, विद्यार्थ्यांना गुण किती मिळाले यापेक्षा विद्यार्थ्यांच्या स्मरणात परिपूर्ण विषय समजला किती हा महत्त्वाचा आहे. विद्यार्थ्याचे पहिले गुरू आई वडील व नंतर शिक्षक असतात. शिक्षक हे जीवनातील मार्गदर्शक असतात. आयुष्यात संस्काराला किंमत जास्त असते ज्याच्याकडे संस्कार असेल त्याला पैसे कमवणे सोपे जाते. समाजातील थोर आदर्श पुरुष यापासून आदर्शवत शिकवण, शिक्षण आणि प्रेरणा मिळते म्हणूनच ते खरे शिक्षक आहेत.
इंदापूर तालुक्यात च्या बाहेरील शिक्षण आणि विद्यानिकेतन प्रोफेशनल अकॅडमी इंदापूरचे शिक्षण शिकवण्याची पद्धत एकच आहे . इंदापूर बाहेरील इतरांचा दिखाऊपणा जास्त आहे.
विद्यानिकेतन हे आसपासच्या ७० किलोमीटरच्या परिसराला वरदान ठरणारी विद्यभ्यासाची संस्था आहे. ही संस्था प्राध्यापक कुणाल काळे सर यांच्या आई-वडिलांच्या सेवादान या संस्कारातून काळे सर घडले आणि त्यांनी चांगली नोकरी सोडून हे विद्येचे दान देण्यासाठी ग्रामीण भागातील यशस्वी विद्यार्थी घडवण्यासाठी अद्यावत विद्यानिकेतन अकॅडमीची उभारणी इंदापूर व वडापुरी येथे सर्व सोयींनी युक्त चांगल्या पद्धतीने चालू केली आहे. आज या अकॅडमीतील विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमाचे आयोजन करून खरंच पालक शिक्षकांनी आणि आमच्यासारख्या पाहुण्यांना कृतकृत केले.
या कार्यक्रमाप्रसंगी श्रेयस नलवडे, कर्चे सर , धाइंजे सर, काळे सर, आणि विद्यार्थी तनुजा गलांडे ज्ञानेश्वर शिरसट, श्रद्धा जामदार, रोहिणी कर्चे ,वैष्णवी शिंदे, राहुल पाटील, कोमल बोराटे, व मुक्ता काळे यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन सौरभ पाटील यांनी केले तर आभार प्रदर्शन नागेश कादे यांनी केले. सदर कार्यक्रम कोरोना संक्रमण होऊ नये याची दक्षता घेऊन संपन्न करण्यात आला.
विद्यार्थ्यांनी एक आगळावेगळा शिक्षकांबद्दल व पालकांबद्दल कृतज्ञता व्यक्त करणारा कार्यक्रम घेतला असून या कार्यक्रमावेळी मान्यवरांना पुस्तक वN95 मास्क वाटप करून शिक्षक दिन साजरा केला.

