shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

केज मध्ये उमरी रस्त्यासाठी सामाजिक संघटना व नागरिकांचा पुढाकार मात्र नगरसेवक अद्यापही झोपेतच..!!


=======================                                           

प्रकाश मुंडे | बीड जिल्हा प्रतिनिधी  :-                     

शहराच्या मध्यभागातुन जाणाऱ्या उमरी रस्त्यावर अवैध धंदे सुरु असल्याने व या रस्त्यावरुन येजा करणाऱ्या विद्यार्थ्यांनी व  महीलांना त्रास होत असल्याने हे सुरू असलेले अवैध धंदे बंद करा म्हणत हा रस्ता रहदारीसाठी खुला करण्यात यावा रस्त्याचे काम लवकरात लवकर करावे या मागणीसाठी केज विकास संघर्ष समितीचे हनुमंत भोसले यांनी शहरातील नागरिकांना सोबत घेऊन दि.७ सप्टेंबर मंगळवार रोजी सकाळी आकरा वाजता शहरातील शिवाजी चौकात भर पावसात एक तास रास्ता रोको आंदोलन करत सात दिवसात  उमरी रस्ता करण्याची मागणी सां.बा.चे उप अभियंता संजय पवार यांच्याकडे केली.    


        

केज शहरातील उमरी रस्त्यावर सुरु असलेले अवैध धंदे बंद करून या रस्त्याचे मजबुतीकरण व डांबरीकरण करुन हा रस्ता नागरिकांना रहदारीसाठी खुला करून देण्यात यावा या मागणीसाठी केज येथील विकास संघर्ष समितीचे हनुमंत भोसले यांच्या नेतृत्वाखाली यापूर्वी अनेक वेळा आमरण उपोषण,घंटानाद , रास्ता रोको अशी शेकडो आंदोलने केज शहरातील नागरिकांनी केली. मात्र प्रत्येक वेळी नागरीकांना प्रशासनाने रस्ता करुन देण्याचे आश्वासन देत आंदोलनातुन माघार घ्यायला लावत वेळ मारुन नेत आलेले आहेत.या उमरी रस्त्यावर अवैध धंदे जोरात सुरु असल्याने या रस्त्यावरुन येजा करणाऱ्या विद्यार्थीनी व महीलांना या अवैध धंदे चालकांचा त्रास व उमरी रस्त्यासाठी केज शहरातील छत्रपती शिवाजी चौकात दि.७ सप्टेंबर मंगळवार रोजी सकाळी आकरा वाजता हे अंदोलन सुरु करून एक तास भरपावसात हा रास्ता रोको करण्यात आला. यावेळी

प्रशासनाच्या वतिने जि.प.सार्वजनिक बांधकाम विभागाचे उप अभियंता संजय पवार यांनी हे मागण्याचे निवेदन स्विकारुन वरीष्ठांनकडून या उमरी रस्त्यासाठी निधी उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन पवार यांनी यावेळी दिले.या रास्ता रोको आंदोलनात संघर्ष समीतीचे हनुमंत भोसले,रुपेश शिंदे,हारुन इनामदार,रत्नाकर शिंदे,मोहन गुंड,किसन कदम,तात्या रोडे,दत्ता हंडीबाग,वंचितचे बबलू साखरे सह अनेक पक्षाचे कार्यकर्ते सहभागी झाले होते.यावेळी ए.पी.आय शंकर वाघमोडे यांनी चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता.                          

               

केज शहरातील वार्ड क्रमांक ४,५,व ६ मधुन हा रस्ता जातो व तेथील नागरिकांसाठी हा खुप वर्षापासून ज्वलंत प्रश्न आहे. या रस्त्याचे अनेक वेळा बिले उचलली गेली आहेत. पण काम मात्र काहीही झाले नाही. या रस्त्याच्या कामासाठी सामाजिक संघटना व नागरिक अनेक दिवसांपासून आंदोलने करत आहेत. पण या ४ , ५ , व ६ प्रभागातील नगरसेवक साफ दुर्लक्ष करत असल्यामुळे तेथील नागरिकात चर्चेचा विषय बनला आहे. येणाऱ्या नगरपंचायत निवडणूक मध्ये विद्यमान नगरसेवकांना या गोष्टीचा निश्चित फटका बसणार आहे.

close