शासकीय योजना आपल्या दारी हा उपक्रम पडस्थळ येथे संपन्न.
इंदापूर प्रतिनिधी:(१ सप्टेंबर २०२१)शासकीय योजना आपल्या दारी,या उपक्रमांतर्गत इंदापूर तालुक्यातील पडस्थळ गावात संजय गांधी निराधार योजनेचा फॉर्म भरून घेण्याचा कार्यक्रम संजय गांधी निराधार योजना समितीचे अध्यक्ष सागर मिसाळ यांच्या प्रमुख उपस्थितीत
पुणे जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष विशाल मारकड यांनी या कार्यक्रमाचे आयोजन (दि १ सप्टेंबर )रोजी केले होते.
यावेळी गावातील विधवा घटस्फोटित दिव्यांगांसाठी योजना इंदिरा गांधी विधवा निवृत्ती वेतन योजना, श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना, इंदिरा गांधी वृद्धापकाळ निवृत्ती वेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्तीवेतन योजना या योजनांबद्दल ची माहिती गावातील जेष्ठ नागरिक व लाभार्थी नागरिकांना देण्यात आले व पात्र लाभार्थ्यांकडून यावेळी अर्ज भरून घेण्यात आले.
यावेळी नितीन झेंडे,पोलीस पाटील गणेश राऊत, लक्ष्मण मारकड,नागनाथ देवकाते,अतुल राऊत, राहुल मारकड, ज्ञानेश्वर देवकाते,राजेश बड, ज्ञानेश्वर कदम, धनाजी मारकड, भाऊसाहेब बड,दादा धोत्रे,बाबा राऊत, विलास शिनगारे,अजिनाथ कदम, नाना बोंगाणे,अनंता राऊत भाऊ कोळेकर, ज्ञानेश्वर कोळेकर, रुषात सरक, भाऊ देवकाते सोहेल काझी व गावातील सर्व ज्येष्ठ नागरिक विधवा निराधार अपंग लाभार्थी उपस्थित होते.
यावेळी पुणे जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष विशाल मारकड म्हणाले की, राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या नेतृत्वाखाली व संजय गांधी निराधार योजना समितीचे अध्यक्ष सागर मिसाळ यांच्या माध्यमातून शासकीय योजना आपल्या दारी हा कार्यक्रम पडस्थळ मध्ये आयोजित करून एकाच छताखाली सर्व लाभार्थी एकत्रित करून सर्वांकडून अर्ज भरून घेण्यात आले. यामध्ये १३० लाभार्थ्यांचे अर्ज भरून घेतले असून त्या अर्जाच्या कागदपत्रांची पूर्तता करून लवकरच लाभार्थ्यांना लाभ मिळवून देणार आहे . त्यामुळे निश्चितच फायदा गावातील पात्र लाभार्थ्यांना होणार आहे असल्याचे त्यांनी सांगितले.

