मच्छिमार यांना विमा कवच मिळावे म्हणून राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांची भेट घेऊन संजय सोनवणे यांनी दिले निवेदन.
इंदापूर प्रतिनिधी:(३ सप्टेंबर २०२१) महाराष्ट्र राज्याचे मत्स्यव्यवसाय राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्याकडे महाराष्ट्रातील मच्छिमारांना व मत्स्य व्यवसायाशी प्रत्यक्ष संबंध असलेल्या व्यक्तींना प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजनेतून मच्छिमार विमा घटकांतर्गत विमा कवच मिळावे यासाठी उजनी मच्छिमार व्यवसायिकांची सामाजिक विकास संस्थेचे संस्थापक अध्यक्ष संजय सोनवणे यांनी पुणे येथे भेट घेत(दि.२ सप्टेंबर) रोजी निवेदन दिले.
महाराष्ट्र राज्यात गोड्या व खाऱ्या पाण्याच्या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात मासेमारी केली जाते .सदरील सर्व मच्छीमार अपवाद वगळता असंघटित आहेत. केंद्र व राज्य पुरस्कृत प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजनेतून संदर्भा अंकित शासन निर्णयान्वये योजना क्रमांक (१३,१३.१) मच्छिमारांना व मत्स्यव्यवसाय यांची प्रत्यक्ष संबंध असलेल्या व्यक्तींना विमा कवच देण्याची तरतूद करण्यात आलेली आहे .सदरील विमा कवच योजनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून व्यापक प्रमाणात अंमलबजावणी करून गोरगरीब मच्छीमारांना न्याय मिळावा या सर्व बाबी विचारात घेता विमा योजनेची व्यापक प्रमाणात अंमलबजावणी होणे करिता आपले स्तरावरुन संबंधितांना आदेश करावी अशा आशयाचे पत्र राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांना दिले असल्याची माहिती पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष संजय सोनवणे यांनी दिली.
तसेच या संस्थेच्या माध्यमातून राज्यातील सर्व मत्स्यमार व संबंधितांना जास्तीत जास्त मदत मिळवून देण्याचा आमचा प्रयत्न आहे. अजुन अनेक योजनांपासून हे मत्स्यमार व इतर कोसो लांब आहेत. त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न केला जाणार आहे. तसेच शासकीय योजना जास्तीत जास्त त्यांना देण्याचा संस्थेचा मानस असल्याचे सोनवणे यांनी सांगितले.

