औरंगाबाद । सतिश लोखंडे ( प्रतिनिधी ):-
सावित्रीमाई साठे यांनी पुकारलेल्या ३० तारखेच्या गऊळ आंदोलन ची दिशा ठरविण्यात आली होती.पण मातंग समाजाचा अक्रमक पवित्र पाहता शासनाला झुकावे लागले व पालकमंत्री मा.अशोकराव चव्हाण साहेब मुंबई येथे त्यांच्या निवासस्थानी तातडीची बैठक बोलवण्यात आल्याने यावर पुतळा बसवुन देण्या संदर्भात सकारात्मक चर्चा झाली असुन कार्यकर्त्यावर दाखल करण्यात आलेले गुन्हे मागे घेणे, पुतळा बसवणे व निधी वाढवून देण्याबाबत सकारात्मक व निर्णयक चर्चा झाली.
हि चर्चा घडवून आणण्यामध्ये मा.गृहराज्यमंत्री रमेश दादा बागवे ,मा.सोनवणे अंकल , आरपीआयचे मा.हनुमंत साठे यांनी महत्त्वाची भूमिका पार पाडली . यावेळी मा.सचिन भाऊ साठे यांच्या सोबत सर्व मानवहित लोकशाही पक्षाचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.सावित्रीमाई नी घोषणा केल्यानंतर तात्काळ गऊळ गावांमध्ये काम सुरू झाले आहे.
पोलीस प्रशासनाची वारंवार आंदोलन मागे घेण्याची विनंती जिल्हा प्रशानची विनंती येणाऱ्या काळातील निवडणूकीतील आचारसंहिता,पावसाचे एकंदरीत वातावरण व पालकमंत्र्यांनी दिलेल्या शब्द या सर्व गोष्टींचा विचार करून ३० तारखेचे आंदोलन थांबण्यात आले.आहे नोंद घ्यावी.

