निमगाव केतकी ते शेटफळ हवेली रोड वरचे खड्डे त्वरित बुजवा अन्यथा शिवसेना स्टाईलने आंदोलन करण्यात येईल. नितीन शिंदे.
इंदापूर प्रतिनिधी: इंदापूर तालुक्यातील शेटफळ हवेली ते निमगाव केतकी रस्त्यावर खड्डे रस्त्यावर की रस्ता खड्यात हेच समजत नाही,इंदापूर तालुक्यातील शेटफळ हवेली ते निमगाव केतकी रोडचे काम गेल्या वर्षी झाले असून सदर रस्ता मुख्य रहदारीचा असुन रेडा रेडणी,काटी,वरकुटे,रामकुंड,शेटफळ हवेली इ. ठिकाणाहुन दुधवाले, शेतकरी व्यापारी मालाची ने आन करीत असतात . रोडचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे झाले आहे त्या ठिकाणी कुठेही डांबर नावाला राहिलेले नाही खडी बाहेर येवुन रस्त्याला मोठ मोठे खडडे पडलेले आहेत .काही ठिकाणी तर खडडे पडुन त्या खडडयामध्ये अपघात झाले आहेत काही जनाचे जिवही गेले आहेत . आम्ही यापुर्वीही अनेक वेळा लेखी व तोंडी तक्रार आपणाकडे केलेल्या आहेत त्या आपणास अवगत आहेत . एवढा घाणेरडा रस्ता इंदापुर तालुक्यात याच्या पुर्वी कधीही झालेला पाहिला नाही .
शासनाने रस्त्यासाठी कोट्यावधी रूपये मंजुर केले परंतु संबधीत ठेकेदाराने मात्र पैसा खिशात घातला . कामामध्ये पाहिजे त्या प्रमाणात डांबर वापरले नाही तसेच रस्त्याची दवाई केली नाही . लागते त्या प्रमाणात मटेरियल वापरले नसल्यामुळेच रस्त्याची दुरावस्था झाली आहे सदर ठेकेदाराचे नाव काळया यादीत टाकुन तो रस्ता संबधीत ठेकेदाराकडून आपल्या स्तरावर त्वरीत करून घेण्यात यावा .अन्यथा आपल्या कार्यालयासमोर शिवसेना स्टाईलने आंदोलन करण्यात येईल याची दखल आपल्या स्तरावर घेण्यात यावी आशी मागणी नितिन शिंदे शिवसेना तालुकाप्रमुख यांनी उप विभागीय अधिकारी बारामती यांच्या कडे केली, आसल्याची माहीती शिंदे यांनी दिली.