shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

इंटरनॅशनल प्राईड अवॉर्ड २०२१" या राष्ट्रीय पुरस्काराने, धनंजय म्हात्रे सन्मानित..!!

राजेश बाष्टे  अलिबाग प्रतिनिधी:

दिनांक ५ सप्टेंबर २०२१ "अँटी करप्शन फाउंडेशन ऑफ इंडिया" यांच्या तर्फे करनाल -  हरीयाणा, येथे आयोजित करण्यात आलेल्या "इंटरनॅशनल प्राईड अवॉर्ड २०२१" या राष्ट्रीय पुरस्काराने, महाराष्ट्रातील  सामाजिक क्षेत्रातील उमदे व्यक्तिमत्त्व  म्हणून धनंजय म्हात्रे यांचा सन्मान करण्यात आला. 





माझी विविध सामाजिक संघटनांच्या माध्यमातून व वैयक्तिक पातळीवरील सामाजिक क्षेत्रातील कामगिरी, तसेच "अँटी करप्शन फाउंडेशन ऑफ इंडिया" च्या माध्यमातून महाराष्ट्रा सहीत देशातील इतर राज्यातील केलेल्या जनजागृतीच्या प्रशंसनीय कामगिरी बद्दल  हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.


या सोहळ्यासाठी अँटी करप्शन फौंडेशन चे राष्ट्रीय अध्यक्ष श्री. नरेंद्र अरोराजी - हरीयाणा,  सुप्रसिद्ध सिने अभिनेता श्री. शक्ती कपूरजी, मिस इंडिया - सिमरन आहुजा, ऑल इंडिया अचिव्हर्स काॅन्फरन्सचे डायरेक्टर श्री. अभिषेक बच्चनजी तसेच देशातील विविध राज्यातील आलेले मान्यवर उपस्थित होते.


आपल्या सर्वांच्या सदीच्छा व आर्शिवादांमुळे माझा हरीयाणा येथे "इंटरनॅशनल प्राईड अवॉर्ड २०२१" या पुरस्काराने पुन्हा एकदा सन्मान करण्यात आला आहे." असे याप्रसंगी धनंजय  म्हात्रे यांनी सांगितले.

close