shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

युवकांनी उद्योग-व्यवसाय करून जीवनाची प्रगती करावी- अमोलराजे इंगळे.

युवकांनी उद्योग-व्यवसाय करून जीवनाची प्रगती करावी- अमोलराजे इंगळे.

 युवा नेते अमोलराजे इंगळे, तंटामुक्ती अध्यक्ष शिवाजी तरंगे व जय हनुमान व्यायाम शाळेचे संस्थापक किरण गोसावी यांच्या हस्ते वडापुरी येथे दोस्ती चायनीज फास्ट फूड अँड रेस्टोरेंटचे उद्घाटन संपन्न.
इंदापूर प्रतिनिधी:(८ सप्टेंबर २०२१) युवकांनी उद्योग-व्यवसाय करून जीवनाची प्रगती करावी. शेती करत व्यवसायाकडेही लक्ष घातले असता आर्थिक प्रगती होते. सध्या युवक मोठ्या प्रमाणात उद्योग व्यवसायाकडे वळत असून त्यांना योग्य मार्गदर्शन होणे गरजेचे आहे असे प्रतिपादन अमोल राजे इंगळे यांनी दोस्ती चायनीज हट च्या उद्घाटन प्रसंगी व्यक्त केले.
यावेळी तंटामुक्ती अध्यक्ष शिवाजी तरंगे व हनुमान व्यायाम शाळेचे संस्थापक अध्यक्ष किरण गोसावी, पैलवान रणजीत श्रीराम, चंगू जाधव, रणजीत शेलार, मयूर कदम, ऋषिकेश वाघमोडे, तुषार शिंदे, रोहित यादव, अक्षय पडळकर, निरंजन भोंग, प्रतीक देवकाते, विकास वाघमोडे, मंगेश भोसले, अभिजीत खबाले, शाहरुख शेख, रोहित सलगर, शुभम मासाळ, सागर दोलतडे, सतीश देवकाते व ग्रामस्थ उपस्थित होते.

वडापुरी येथे दोस्ती चायनीज हट या हॉटेल व्यवसायाची उभारणे काटी गावचे ज्ञानेश्वर तानाजी देवकाते व वरकुटे खुर्द गावचे गणेश दत्तू सरडे  या दोघांनी मिळून  चालू केली. हे युवक दोघेही शेतकरी कुटुंबातील असून त्यांनी पैलवानकी  केलेली आहे.
close