shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

हेमंत मुसरिफ, पुणे यांच्या सुंदर कविता..!

1
गौरी गणपती  ..

देवी सह  गणेशाची 
नित्य करतो आरती 
गौरी माते  नमूनिया 
मागत राहतो  शक्ती

आम्ही देवींचे  भक्त
अव्याहत करे भक्ती
शक्तीपाठ पूजाथाट 
भजत राहे  नवराती 

सजावटमनोरम्य ती
पक्वान्न भोग  किती
नात्यांचा सुरेख सण
सजे  गौरी  गणपती

देवीस भजतो  परंतु 
भिन्नउक्ती अन् कृती 
महिला भासे अबला
इथे  आमची विकृती

हव्या दिव्यात  वाती
उजळे  प्रकाशदिप्ती
नव  चष्म्यातूनि पहा
सणास गौरीगणपती

- हेमंत मुसरीफ पुणे. 
  9730306996.
www.kavyakusum.com

2
गौरी पूजन..

गौरी गणपती उत्सव 
तयारी  जय्यत किती
दिवसरात्र भारावलेले
खास  घडवली  मुर्ती 

शक्ती पाठ पूजा थाट 
भजत राहे  दिसराती 
अंधार घालवं म्हणतो
उजळतो लक्ष ज्योती

गरबादांडिया खेळता
अंगीलखलख स्फूर्ती 
महिलारूपात असूनि 
देवीला  मागतो शक्ती 

गौरीला  मानसन्मान 
भिन्न उक्ती अन् कृती 
महिला मानी  अबला
दिसे  आमची विकृती

पुरूष प्रधान संस्कृती 
बदलेलं कधीआकृति
स्त्रीपुरुष  वेगळे नाही
बदलूनि टाका  प्रकृति

- हेमंत मुसरीफ पुणे. 
  9730306996.
  www.kavyakusum.com

3)
लक्ष्मी पुजा ..

दिवस  रात्र  कमवी
तिजोरीत पैसा ठेवी
पैसा  सवत्र   गुंतवी
भरगच्च  बॅंक  ठेवी

आर्त प्रार्थना करतो
हो प्रसन्न लक्ष्मीदेवी
हव्यास उगा वाढवी
अर्धे  मुर्धेची   जेवी

सोने माणके जमवी
पैशात मनास रमवी
युक्ती क्लृप्ती  चाले
भल्या भल्या नमवी

लक्ष्मी घरीचं रहावी
पिढी वैभवात भावी
लक्ष्मी जखडून ठेवी
फक्त माझी असावी

गरजूसमदत करावी
मन रूंदी  वाढवावी
लक्ष्मी होईलं  प्रसन्न
युक्ती  करुन पहावी

लक्ष्मीभलती चंचल
बंधनात बा  नसावी
चराचरात रे वसावी
प्रत्येकघरात हसावी

- हेमंत मुसरीफ पुणे 
  9730306996
  www.kavyaskusum.com

4)
खरे पूजन ..

आवश्यक आहे धन
कमवावे   भरभरून
पैशाहून ते समाधान
वहावे नीत ओसंडून

कमवलेले  सारे धन 
ठेवू नकात रे बांधून
ठेवता धनास डांबून
कधीही जाई  सोडून

ताज्या जरी  भाज्या
जाती  ठेवता  सडून
अत्तर  होई  निरुत्तर
जाईलं  एकदा उडून

घडी कशीही चांगली
पहा एकदा उलगडून
धना  बरोबर  माणसे
ठेवावीत नित्यजोडून

गरजूंना करता  मदत
माणूस  सधन  संपन्न
हेचि  लक्ष्मीचे  पूजन
देवीमा  राहीलं प्रसन्न

- हेमंत मुसरीफ पुणे 
  9730306996
  www.kavyaskusum.com

close