अखेर भिमराव खराटे याचा त्याच्या पत्नी व मुलाने प्रियकराच्या मदतीने केला खून..!!
न्यायालयाच्या आदेशाने गुन्हा दाखल !
------------------------------------------------------
प्रकाश मुंडे | बीड जिल्हा प्रतिनिधी :-
केज तालुक्यातील युसुफवडगाव पोलीस स्टेशन हद्दीत विहिरीत सापडलेल्या मृतदेह प्रकरणाला वेगळे वळण लागले असून मयताच्या भावाने न्यायालयात दाखल केलेल्या दाव्या नुसार अखेर मयताची पत्नी, मुलगा व अन्य एकावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या बाबतची माहिती अशी की, दि. २९ मे रोजी कळंब एसटी आगारातील चालक भिमराव खराटे (मूळ गाव भोगजी ता. कळंब) याचे प्रेत युसुफवडगाव पोलीस स्टेशन हद्दीतील मांगवडगाव शिवारातील धनराज थोरात यांच्या विहित आढळून आले होते. या प्रकरणी युसुफवडगाव पोलीस स्टेशनला सीआरपीसी १७४ प्रमाणे आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली होती.
दरम्यान दि. १० जून रोजी मयताचा भाऊ बालाजी रंगनाथ खराटे यांनी जिल्हा पोलीस अधिक्षक आणि उपविभागीय पोलीस अधिकारी केज यांना निवेदन दिले होते. त्यात म्हटले होते की, मयत भिमराव खराटे याच्या पत्नीचे गावातील एकाशी अनैतिक संबंध होते. तसेच ते दोघे पती-पत्नी हे मागील दहा वर्षां पासून विभक्त राहत होते. तसेच मयत भिमराव खराटे हा ४/५ वर्षां पासून आंधळेवाडी ता. केज एका दुसऱ्या महिले सोबत अनैतिक संबंध होते. ते पती-पत्नी सारखे दोघे एकत्र राहत होते. भिमराव हा स्वेच्छा निवृत्ती घेणार होता. त्या नंतर त्याला सेवा निवृत्ती नंतर मिळणाऱ्या लाभ व रक्कम ही तो त्याची रखेली हिला देणार असल्याची माहिती त्याच्या पहिल्या पत्नीला मिळाली होती. म्हणून त्याची पहिली पत्नी व तिचा प्रियकर याने दि. २५ मे रोजी सायंकाळी ५:३० च्या दरम्यान भिमराव हा त्याची ड्युटी संपवून घरी जात असताना त्याला मोटार सायकलवर बसवून घेऊन गेले. त्या दोघानी भिमराव याला निर्जन स्थळी मारहाण करून त्याला मारून त्याचे प्रेत मांगवडगाव शिवारातील धनराज थोरात याच्या विहिरीत टाकले असल्याचा खळबळजनक आरोप मयत भीमरावचा भाऊ बालाजी खराटे यांनी होता.
तसेच या प्रकरणी मयताची पत्नी तिचा प्रियकर व मुलावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यासाठी त्यांनी केज न्यायालयात दि. २२ जुलै २०२१ रोजी रजि. क्र. ३२९/२०२१ नुसार दाद मागितली होती.
त्यावर केज न्यायालय मा. प्रथम वर्ग न्यायाधीश यांच्या आदेशानुसार या प्रकरणी फौजदारी प्रक्रिया संहिता १५६(३) नुसार मयताची पत्नी राधाबाई भिमराव खराटे, मुलगा सिद्धेश्वर भिमराव खराटे व महादेव अच्युत खराटे यांच्या विरुद्ध युसुफवडगाव पोलीस ठाण्यात गु. र. न. १३३/२०२१ भा. दं. वि. ३०२ १२० (ब) १०९ व ३४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप दहिफळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय आटोळे हे पुढील तपास करीत आहेत.
--------------------------------------------------
मयत भिमराव खराटे याचा भाऊ बालाजी खराटे यांनी पोलीस अधिकाऱ्यांना या प्रकरणी खुनाचा संशय असून गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती परंतु गुन्हा न दाखल झाल्यामुळे त्यांना न्यायालयाचा दरवाजा ठोठावावा लागला.
-----------------------------------------------
नवरा बायकोचे दोघांचेही अनैतिक संबंध
:- मयत भिमराव खराटे याच्या पत्नीचे भोगजी या गावातील एका पुरुषा सोबत अनैतिक संबंध होते. या अनैतिक9 संबंधातून भिमराव खराटेचा खून झाला अंदाज आहे.

