कन्नड । घाटशेंद्रा;
शोषित, पिडीत वंचित घटकातील समुहानां सत्ता संपादन करून देणे हेच बाळासाहेब आबेंडकर चें ध्येय व स्वप्न आहे. आणि ते पूर्ण करण्यासाठी कार्यकर्ते पक्ष वाढी साठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. असे प्रतिपादन वंचित बहुजन आघाडी चे जिल्हा सहसचिव अनिल सिरसाट यांनी घाटशेंद्रा येथील शाखा उदघाटन प्रसंगी केले.
कन्नड तालुक्यातील घाटशेंद्रा व वाकोद येथे वंचित बहुजन आघाडी शाखा नामफलकाचे उदघाटन वंचित बहुजन आघाडी चे जिल्हा अध्यक्ष योगेश बन यांचे हस्ते करण्यात आले. याप्रसंगी जिल्हा महासचिव शाम भारसाखळे, जिल्हा उपाध्यक्ष अशोक शेजवळ , जिल्हा सहसचिव अनिल सिरसाठ , तालुका अध्यक्ष देवीदास राठोड, तालुका उपाध्यक्ष राजु भिवसने, तालुका संघटक गणेश मोरे, तालुका सचिव सुभाष सिरसाट व भिमराव खिल्लारे , तालुका महासचिव रईस सौदागर, तालुका संयोजक तातेराव भुजंग, तालुका सदस्य अमोल साळवे, तालुका महासचिव युवराज बागुल, तालुका संघटक सुनिल बोरडे, तालुका सदस्य अमोल साळवे, तालुका सदस्य सतिश धनेधर, सुनिल सिरसाट, सागर मोरे, अमृता चौगुले, चिंचोली सर्कल प्रमुख भागवत चौथमल, उपाध्यक्ष शिवाजी सौदागर घाटशेंद्रा शाखा प्रमुख ज्ञानेश्वर लोखंडे, उपाध्यक्ष सतिश गायकवाड, सचिव अशपाक सय्यद, योगेश बनकर, सहसचिव सागर गायकवाड आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

